म्युकरमायकोसीस म्हणजे काय? काय आहेत लक्षणे? कसे दूर ठेवाल? वाचा उत्तरे…

हा आजार म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणे कोणती, हा आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. याबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)द्वारे माहिती देण्यात आली आहे.

देशभरात सध्या म्युकरमायकोसीस या आजाराबाबत लोकांच्या मनात भातीचे वातावरण आहे. राज्यातही काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण हे या आजाराने त्रासलेले आहेत. राज्य सरकारतर्फे या आजाराच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. पण हा आजार म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणे कोणती, हा आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. याबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)द्वारे माहिती देण्यात आली आहे.

म्युकरमायकोसीस म्हणजे काय?

हा बुरशीजन्य आजार असून, म्युकरमायसिट्स विषाणूंच्या गटामुळे होतो. संपूर्ण वातावरणात, माती तसेच सडणारे सेंद्रिय पदार्थ(पाने, कंपोस्ट) आणि सडणारे लाकूड यामध्ये हा विषाणू आढळतो. वातावरणातील अशा बुरशीजन्य बीजाणूंच्या संपर्कात आल्याने व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. ज्यांना आरोग्यविषयक गंभीर समस्या आहेत, तसेच इतर आजारांशी लढण्यासाठी जे लोक औषधे घेत आहेत त्यांना हा आजार होऊ शकतो. त्वचेवर कापलेले किंवा भाजलेले असल्यास, त्याद्वारे या विषाणूच्या बुरशीने प्रवेश केल्यानंतर त्वचेवर म्युकरमायकोसीस विकसित होऊ शकतो.

(हेही वाचाः १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरण मोहिमेला लागणार ब्रेक?)

अशी आहेत लक्षणे

 • डोळे किंवा नाक दुखणे, तसेच नाक किंवा डोळ्यांच्या भोवती लालसरपणा येणे.
 • ताप येणे.
 • तीव्र डोकेदुखी.
 • कफ होणे.
 • श्वास घ्यायला त्रास होणे.
 • रक्ताच्या उलट्या होणे.
 • मानसिक स्वास्थ्य बिघडणे.

कोणाला होऊ शकतो?

 • ज्यांचा डायबेटिस हा प्रमाणाच्या बाहेर आहे.
 • सतत औषधांच्या सेवनामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे.
 • दीर्घकाळ आयसीयू वर उपचार घेत असणारे रुग्ण.
 • कॅन्सरसारख्या सहव्याधी असणारे रुग्ण.

(हेही वाचाः 5-जी तंत्रज्ञान आणि कोविड-19चा फैलाव… अफवांबाबत दूरसंवाद विभागाचे स्पष्टीकरण!)

कशी घ्याल काळजी?

 • धुळीच्या ठिकाणी जाताना तोंडावर मास्क लावा.
 • बागकाम करताना पायात बूट, लाँग पँट, हातात ग्वोव्हज् घाला.
 • त्वचेची अॅलर्जी होऊ नये म्हणून साबण लावून स्वच्छ हात-पाय धूत रहा.

कसा ओळखाल आजार?

कोविड रुग्ण आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींनी हा आजार कसा ओळखावा याची लक्षणे-

 • नाक चोंदणे, सतत नाक गळणे, गालाचे हाड दुखणे.
 • चेह-याच्या एका बाजूला तीव्र वेदना होणे किंवा सूज येणे.
 • नाकाजवळील भाग किंवा टाळूवर काळसर डाग पडणे.
 • दात दुखणे, दात पडणे, जबडा दुखणे.
 • अंधुक दिसणे, डोळे दुखणे, ताप येणे त्वचेच्या विकृती होणे.
 • छातीत दुखणे, त्वचेतून रक्तस्त्राव होणे, श्वसन क्रिया बिघडणे.

काय करावे?

 • हायपरग्लायसेमिया नियंत्रित ठेवणे.
 • कोरोनातून बरे झाल्यानंतर शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण मोजणे.
 • डायबेटिस असणा-या व्यक्तींनी शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण मोजणे.
 • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे योग्य डोस योग्य वेळी घेणे.
 • अँटीबायोटिक्स आणि अँटीफंगल औषधांचे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन करणे.

काय करू नये?

 • सांगितलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
 • सातत्याने नाक चोंदत असल्यास त्याकडे जास्त दुर्लक्ष करू नये. विशेषतः कोविडबाधित आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींनी.
 • त्वचेवरील अॅलर्जीकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपचार करा.
 • म्युकरमायकोसीसच्या आजारावरील उपचारांसाठी वेळ दवडू नका.

आजार होऊ नये म्हणून काय कराल?

 • डायबेटिस नियंत्रणात ठेवा.
 • व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा.
 • जास्त आवश्यकता नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचे डोस कमी करा.
 • डॉक्टरांच्या सल्ल्यांचे काटेकोरपणे पालन करा.

(हेही वाचाः म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार आता मोफत उपचार! काय म्हणाले टोपे?)

राज्य सरकार करणार मोफत उपचार

या आजारावरील औषध महागडे असून, त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here