Sinhagad Fort : सिंहगड किल्ल्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे का ?

39
Sinhagad Fort : सिंहगड किल्ल्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे का ?
Sinhagad Fort : सिंहगड किल्ल्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे का ?

पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील (Pune) एक सुप्रसिध्द आणि लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो १२९० मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युध्द झाले. तानाजी मालुसरे युद्धात कामी आलेले ऐकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, ”गड आला; पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून ‘सिंहगड’ असे ठेवले. (Sinhagad Fort)

(हेही वाचा – मुंबईतील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या mumbadevi temple nearest railway station कसं पोहोचता येईल ? वाचा सविस्तर )

पुणे शहर सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक आहे. पुण्यात ऐतिहासिक अन् पर्यटन स्थळ म्हणून सिंहगड किल्ला प्रसिद्ध आहे. पुण्यापासून साधारण २५ किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते.

एका आख्यायिकेनुसार कौडण्यऋषी यांनी येथे तपश्चर्या केली. म्हणून कोंढाणा नाव झाले. शिवाजी महाराजांच्या काळात तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला चढाई करुन जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले. शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला” हे वाक्य उच्चारले. त्यानंतर या किल्ल्यास सिंहगड हे नाव पडले.

सिंहगडाच्या पश्चिमेस कल्याण दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.

गडावर कोंढाणेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे. कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे. (Sinhagad Fort)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.