दसऱ्याला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा साजरा (Dussehra Wishes) केला जातो. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. यंदा दसरा हा सण दि. ११ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे यादिवशी आपण आपल्या प्रियजनांना, मित्रांना, मैत्रिणीला शुभेच्छा संदेश पाठवत असतो. त्यामुळे इथे दसऱ्यानिमित्त पाठवता येणारे शुभेच्छा संदेश आपण जाणून घेऊया.(Dussehra Wishes)
दसऱ्याच्या (Dussehra Wishes) मराठमोळ्या शुभेच्छा
१) समृद्धीचे दारी तोरण
आनंदाचा हा दसरा सण
सोने लुटून हे शिलगण
हर्षाचे उजळू द्या अंगण
सर्वांना दसरा व विजयदशमीच्या मंगलमय शुभेच्छा!
२) विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध,
सोन्यासह वाढू दे दसऱ्याचा आनंद
विजयादशमी, दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
३) आपट्याची पाने, झेंडुची फुले
घेवूनी आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी
दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
४) सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू शिखर यशाचे! प्रगतीचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे! दसऱ्याच्या शुभेच्छा!
५) दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!(Dussehra Wishes)