‘आरटीओ’ आणि वाहतूक पोलीस यांच्यात काय आहे फरक?

669
ट्रॅफिक पोलिसांना अनेक जण ‘आरटीओ’वाले असल्याचे समजून त्यांना गंभीरतेने घेत नाही आणि गैरसमजुतीतून अनेक वेळा ट्रॅफिक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये रस्त्यावर खटके उडतांना दिसून येतात. काही जण तर ट्रॅफिक पोलिसांवर हात उचलायला मागे पुढे बघत नसल्याचे वाहतूक विभागाच्या एका पोलीस अधिका-याने सांगितले.
ट्रॅफिक पोलिसांच्या युनिफॉर्ममधील पांढऱ्या शर्टामुळे अनेकांचा हा गैरसमज होत असल्याचे कारण समोर आले आहे. लोकांना आरटीओ आणि वाहतूक पोलिसांतील फरक कळायला हवा आणि ट्रॅफिक पोलीस हा पोलीस दलाचा एक भाग असल्याचे कळले, तर ट्रॅफिक पोलीस आणि वाहन चालकातील वाद काही प्रमाणात कमी होऊ शकतात, असे अधिकारी यांचे म्हणणे आहे.

वाहतूक पोलीस पोलीस दलाचाच भाग

ट्रॅफिक पोलीस हा पोलीस दलाचा एक भाग असून पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या अंतर्गत बदल्या होऊन त्यांना पोलीस दलातील विविध विभागात काम करण्यासाठी पाठवले जाते, वाहतूक विभाग हादेखील पोलीस दलाचा एक घटक असून या विभागात देखील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार बदली होऊन येतात. वाहतूक पोलिसांकडे वाहतूक नियंत्रण करणे, वाहतुकीचे नियम मोडणारे अथवा पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्या अंतर्गत कारवाई करून त्यांची अंमलबजावणी करणे इत्यादी जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे देण्यात आलेली आहे.
आरटीओ म्हणजे ‘रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर’  राज्यातील  प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यात  मोटार परिवहन विभागाचे प्रादेशिक वाहतूक कार्यालय (रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस) आहेत. या रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसचा एक मुख्य अधिकारी असतो त्याला रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर म्हणजेच आरटीओ असे संबोधले जाते. वाहनांची नोंदणी करणे, मोटार वाहन कर व प्रवासी कर वसुल करणे, परवाने (सार्वजनिक प्रवासी/माल वाहतूक) जारी करणे.

कोणती कामे आरटीओ कार्यालयात होतात?

शिकाऊ व पक्की वाहन चालक अनुज्ञप्ती देणे, वाहन चालविण्याची चाचणी घेणे, परिवहन वाहनांचे वार्षिक योग्यता प्रमाणपत्र देणे, नुतनीकरण करणे, नोंदणीकृत वाहनांचे अभिलेख तयार करणे, वाहन हस्तांतरण, गहाण व्यवहाराची नोंद करणे, परिवहनाशी निगडीत असलेले खटले हाताळणे, अपघाती वाहनांची यांत्रिक तपासणी करणे, रस्त्यावर विविध गुन्ह्यांसाठी वाहनांची तपासणी करणे, वायुप्रदुषण विषयक कामे हाताळणे, आंतरराज्यीय वाहतूक करारविषयक कामे करणे इत्यादी कामे आरटीओ कार्यालयात केली जातात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.