आयुष्मान भारत (Ayushman Bharat) दिन हा भारताच्या प्रमुख आरोग्य सेवा कार्यक्रमांपैकी एक आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी भारत सरकारने २३ सप्टेंबर २०१८ रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) सुरू केली. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (बीपीएल धारक) आरोग्य विमा प्रदान करणे हा आहे. यामध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा दिला जातो.
आयुष्मान भारत (Ayushman Bharat) दिन दरवर्षी ३० एप्रिल रोजी साजरा केला जातो. “आयुष्मान भारत” ही देशातील सर्वात व्यापक आरोग्य क्षेत्रातील योजना आहे ज्यास “मोदी-केअर” देखील म्हटले जाते. ही योजना केंद्रीय अर्थसंकल्प २०१८ मध्ये सुरू करण्यात आली, ज्याचे दोन मुख्य स्तंभ आहेत, पहिले, देशात एक लाख आरोग्य आणि निरोगी केंद्रे स्थापन करणे आणि दुसरे म्हणजे १० कोटी कुटुंबांना वार्षिक ५ लाख रुपयांच्या आरोग्य विमा संरक्षण देणे.
आयुष्मान भारत (Ayushman Bharat) दिनाचा मुख्य हेतू म्हणजे आयुष्मान भारत दिनाविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि सर्वसामान्यांना स्वस्त दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, असा आहे. भारतातील दुर्गम भागातील अनेक गरीब कुटुंबांना अजूनही आयुष्यमान भारत योजनेची माहिती नाही. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत, अशा कुटुंबांना आयुष्यमान योजनेची माहिती दिली जाते जेणेकरून त्यांनाही या योजनेची लाभ घेता येईल.
आयुष्यमान भारत (Ayushman Bharat) दिनानिमित्त आरोग्य शिबिरे आयोजित करून लोकांना मोफत उपचार दिले जातात. यासोबतच या शिबिरांमध्ये लोकांना आयुष्यमान भारत योजनेबद्दलही सांगितले जाते. तसेच जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या कार्यक्रमांमध्ये लोकांची आयुष्यमान भारत कार्डही बनवली जातात. विशेष म्हणजे भारत सरकारचा आरोग्य विभाग सोशल मीडिया साइट्सवर पोस्ट टाकून आणि हॅशटॅग चालवून लोकांना आयुष्यमान भारत योजनेबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करतो.
Join Our WhatsApp Community