National Youth Day दरवर्षी १२ जानेवारी रोजी सबंध भारतात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्त्यामध्ये विवेकानंदांचा जन्म झाला. अमेरिकेमध्ये जाऊन स्वामींनी हिंदू धर्माची महती सांगितली. सापांचा खेळ खेळणारा देश या दृष्टीने भारताकडे पाहिलं जायचं. स्वामींनी तिथे जाऊन सांगितलं की भारतीय संस्कृती किती पुढारलेली आहे, प्राचीन आहे.
विवेकानंद अतिशय तरुण वयात संन्यासी झाले. मात्र इतर संन्यास्यांप्रमाणे त्यांच्या जीवनाचा उद्देश मोक्ष प्राप्ती नव्हता तर ते कर्मवादी होते. ते संन्यासी होते तरी त्यांनी आपली वाणी तलवारीसारखी चालवली. म्हणूनच त्यांना योद्धा संन्यासी म्हणतात. तारुण्य हा त्यांच्या अनेक गुणांपैकी एक गुण म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आपण युवा दिन म्हणून साजरा करतो.
भारत सरकारने १९८४ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याचे घोषित केले. पुढील वर्षी म्हणजे १९८५ पासून देशभरात दरवर्षी १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जाऊ लागला. स्वामी विवेकानंदांचे विचार आणि आदर्श प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे.
स्वामी विवेकानंदांनी केवळ भारतातच नव्हे तर पाश्चात्य जगातही हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र आता विवेकानंदांना मानणारे हिंदू हा शब्द बोलताना घाबरतात. जे चुकीचं आहे. विवेकानंदांनी आजीवन हिंदूत्वासाठी कार्य केलेलं आहे. तर युवा दिन साजरा करताना ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. तर या वर्षीची थीम आहे “इट्स ऑल इन द माइंड” याचा अर्थ सगळं काही तुमच्या मनात आहे. तरुणांपर्यंत विवेकानंदांची नैतिक मूल्ये, शिकवण आणि चारित्र्य रुजवून सशक्त आणि सक्षम देशभक्त पिढी घडवणे हा या वर्षीच्या थीमचा उद्देश आहे.
Join Our WhatsApp Community