दरवर्षी ८ मे रोजी “जागतिक रेडक्रॉस दिन” (Red Cross Day) जगभरात साजरा केला जातो. हा दिवस रेडक्रॉसचे संस्थापक आणि पहिले नोबेल शांतता पारितोषिक विजेते जीन हेन्री ड्युनंट यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. जागतिक रेडक्रॉस दिन हा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
आपत्कालीन, आपत्ती आणि इतर संकटांच्या वेळी गरजू लोकांना मदत करणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच शांतता, आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करणे याकडे देखील लक्ष दिले जाते. हेन्री ड्युनंट यांनी ९ फेब्रुवारी १८६३ रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे पाच जणांची समिती स्थापन करून या संस्थेची स्थापना केली. यास त्यांनी “इंटरनेशनल कमिटी फॉर रिलीफ टू द वाउंडेड” असे नाव दिले.
त्यावर्षी जिनिव्हा येथे एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली ज्यामध्ये या संघटनेत १८ देश सहभागी झाले होते. त्यानंतर रेडक्रॉस सोसायटीला कायदेशीर स्वरूप देण्यात आले. या संस्थेचे चिन्ह पांढऱ्या पट्टीवर लाल क्रॉस (Red Cross Day) असे आहे. रेडक्रॉस संस्थेने १९३७ मध्ये अमेरिकेत जगातील पहिली रक्तपेढी उघडली. ही संस्था थॅलेसेमिया, कॅन्सर, ॲनिमिया आणि एड्स सारख्या जीवघेण्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना मदत करते.
(हेही वाचा Railway Line Tree Cutting : रेल्वे लगत झाडांवरील फांद्यांच्या छाटणीचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतूनच )
भारताचा रेडक्रॉस पहिल्या महायुद्धाशी संबंधित आहे. भारतात, भारतीय रेडक्रॉस सोसायटीची स्थापना १९२० मध्ये संसदीय कायद्यांतर्गत झाली, तेव्हापासून रेडक्रॉस (Red Cross Day) स्वयंसेवक विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये नि:स्वार्थपणे आपली सेवा देत आहेत. पुढे संस्थेच्या १८ प्रांतिक संस्था आणि ४१२ जिल्हा शाखा स्थापन झाल्या आहेत. बंगालमधील दुष्काळ आणि अनेक नैसर्गिक आपत्तींच्या काळात त्यांनी मदत केली आहे.
Join Our WhatsApp Community