हिंदू संघटित झाले नाही, तर मारले जातील. त्यामुळे हिंदूंनी संघटित होण्याची गरज आहे. नुपूर शर्मा जे बोलल्या ते योग्यच होते, त्यावर इतका गोंधळ करण्याची गरज नव्हती, असे पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी सांगितले.
…तर १५ देश हिंदू राष्ट्र घोषित होतील
मोबाईल, संगणक आणि रॉकेटच्या युगातही सनातन धर्म सर्वात महत्त्वाचा आहे. कारण येथे सनातन धर्म हा शाश्वत आहे. हिंदू जगातील 50 हून अधिक देशांमध्ये राहतात. जर भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषीत केले तर वर्षभरात मॉरिशससह 15 देश हिंदू राष्ट्र घोषित होतील. जयपूर येथील गोविंद देवजी मंदिरात सर्व समाज हिंदू महासभेने आयोजित केलेल्या धार्मिक सभेला ते संबोधित करत होते, असे वक्तव्य पुरी पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले. स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले की, गीतेचा भाग बायबलमधून काढून टाकला तर बायबलच नष्ट होईल. खुद्द अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर विश्वास ठेवला होता. मोबाईल, कॉम्प्युटर आणि रॉकेटच्या युगातही सनातन धर्म सर्वात महत्वाचा आहे, कारण तिथे फक्त सनातन आहे, जो शाश्वत आहे, असेही शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले.
(हेही वाचा सत्ता संघर्षाची सुनावणी लाईव्ह दिसणार?)
Join Our WhatsApp Community