भाजप नेते किरीट सोमय्या यांना असलेल्या ‘झेड प्लस’ सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी त्यांच्या सुरक्षेसाठी असलेले सीआयएसएफचे जवान काय करीत होते, असा प्रश्न मुंबई पोलीस आयुक्तांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या आयजी यांना पत्र लिहून विचारला असून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. या सुरक्षेसाठी शस्त्रधारी सीआयएसएफचे जवान २४ तास सोमय्या यांच्या सोबत असतात. २३ एप्रिल रोजी रात्री किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्य यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते, त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्यावर दगड, बॉटल आणि चप्पलाने हल्ला केला. या हल्ल्यात सोमय्या हे किरकोळ जखमी झाले होते.
हल्ल्यानंतर सोमय्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण
सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, मात्र सोमय्या यांना केंद्र सरकारकडून पुरविण्यात आलेली झेड प्लस सिक्युरिटी हल्ल्याच्या वेळी नेमकी कुठे होती, त्यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न का नाही केला असा सवाल उपस्थित होत आहे. सोमय्या यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांना लक्ष करण्यात आले.
(हेही वाचा – सोमय्या हल्ला प्रकरण: सूज-रक्तस्राव नाही; वैद्यकीय अहवाल समोर)
पत्रात काय म्हटले?
या दरम्यान मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सीआयएसएफच्या सुरक्षेवर सवाल उठवला असून सीआयएसएफचे महासंचालक यांना पत्र पाठवून किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी सीआयएसएफची सुरक्षा काय करीत होती, याची चौकशी करण्यात यावी असे पत्रात म्हटले आहे.त्यानी हल्लेखोराना अटकाव का नाही केला या संपूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी यापत्राद्वारे करण्यात आली आहे. आयुक्तांच्या या पत्रामुळे केंद्राकडून पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण होत आहे.
Join Our WhatsApp Community