WhatsApp होणार बंद; ‘या’ यादीत तुमचा स्मार्टफोन तर नाही ना?

143

जगभरातील लाखो युजर्स मेसेजिंग अ‍ॅपसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. दैनंदिन जीवनात आपण बहुतेक गोष्टी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एकमेकांना पाठवतो. अनेक फाइल्स शेअर करण्यासाठी आपण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. मात्र आता अँड्रॉइड आणि आयफोन यूजर्सना मोठा धक्का बसणार आहे. कारण आजपासून म्हणजेच २४ ऑक्टोबरपासून काही जुन्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप वापरता येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. पण कोणत्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप बंद होणार आहे… बघा याची यादी

(हेही वाचा – केतकी पुन्हा भडकली; म्हणाली, “… आणि धर्माची माती करु नका”)

या फोन्समध्ये व्हॉट्सअप होणार बंद

अॅपलकडून आलेल्या एका निवेदनानुसार, इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअप कंपनीच्या iOS 10 आणि iOS 11 डिव्हाइसला सपोर्ट करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोप्या भाषेत सांगायचे तर, Apple चे iOS 10 आणि iOS 11 युजर्सना व्हॉट्सअपचा वापर करता येणार नाही. तर, अॅन्डरॉईड 4.1 किंवा त्यापूर्वीच्या सर्व स्मार्टफोनवर व्हॉट्सअप वापरता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

सध्या अॅन्डरॉईड 13 अपडेट रोल आउट केले जात आहे. तर, अॅपल iOS 16 चे अपडेट दिले जात आहे. त्यामुळे अॅपलच्या 8 वर्ष जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. तर अॅन्डरॉईडच्या जवळपास 12 वर्षे जुन्या डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअप वापरता येणार नाही. अनेक मोबाईल कंपन्या जुन्या स्मार्टफोनसाठी अपडेट्स देत नसल्याचे युजर्सची समस्या आहे. अशा परिस्थितीत जुन्या स्मार्टफोनमध्ये हॅकिंग आणि बँक फसवणूकीचा धोका मोठा आहे. त्यामुळे कंपनीने आता या काही ठराविक फोन्समध्ये व्हॉट्सअप सपोर्ट करणं सुरू केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.