व्हॉट्स ॲप चॅट बॉट’…पालिकेच्या ८० पेक्षा अधिक सेवांची घरबसल्या माहिती मिळणार!!

146

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहेत.

याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईतील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकारी, तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे याप्रसंगी उपस्थित होते.

( हेही वाचा : आरोग्य विभागापेक्षा बूस्टरसाठी ‘या’ विभागाचे कर्मचारी आहेत आघाडीवर! )

८० हून अधिक सुविधा

मकर संक्रांतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही, असा गैरसमज आहे. परंतु त्याला छेद देणारा आजचा उपक्रम आहे. माझी महापालिका, माझे सरकार, त्याच्याशी माझा सुलभपणे संवाद झाला पाहिजे, असे नागरिकांना नेहमी वाटते. ती सुविधा नागरिकांना पालिका उपलब्ध करून देणार आहे. मत मागतांना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांसाठी काम करायचे असते ती नेहमीच विनम्र असतात. आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील एक नंबरची महापालिका जिने जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या दिल्या आहेत. वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली. तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे, त्याचा जनतेला अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचा विचार व्हावा. सेल्युलर फोन वापरण्यामध्ये देश खुप अग्रेसर पण त्याचा जनतेला काही उपयोग करून देता येईल का, याचा विचार करायला हवा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

bmc mumbai1 1

कोविड काळात महापालिकेचे काम कौतुकास्पद

तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही. मुंबई महापालिका तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वसामान्य नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहे. ५०० चौ. फुटाच्या घरकुलावरील घरपट्टी माफ, मग कोस्टल रोडचा मावळाने पूर्ण केलेला बोगदा आणि आज मुंबईकरांना ८० सुविधा बोटाच्या टीपेवर मिळणे, ही सगळी चांगली कामे महापालिकेने केली आहेत. जनतेच्या सेवेसाठी काम करताना महापालिका लपवाछपवी करत नाही. नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे. कोविड काळात महापालिकेचे काम कौतुकास्पद होते. स्वत: काही करायचं नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काही जण नेहमी उपस्थित करतात. महापालिका नेहमीच सहकार्य करेल, असे वचन मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले आहे.

( हेही वाचा : महिन्याला चर बुजवण्यासाठी मुंबई महापालिका खर्च करते ‘ इतके’ कोटी रुपये )

मुंबई महापालिका जगातील एकमेव उदाहरण

इन्स्टा, फेसबूक चा महाराष्ट्र पर्यटनासाठी करणार आहे. कोविड चॅटबॉट आपण महापालिकेत सुरु केले आहेत. जगात अशी एक दोनच राज्ये, त्यात आपलाही समावेश आहे. वर्क फ्रॉम होम कल्चर सक्षम करण्याचा महापालिकेचा कायम प्रयत्न राहील. पाणी पट्टी, घरपट्टी, वीज बिल भरणे, महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा अशा अनेक ८० हून अधिक सुविधा नागरिकांना या व्हॉटसअप चॅट बॉट द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. माय बीएमसी ट्वीटर हॅन्डलवर तक्रार दाखल करण्यात येणार आहे. आज महापालिका जगातील एकमेव उदाहरण असेल की, जिथे ८० पेक्षा जास्त सुविधा आपण नागरिकांना देत आहोत. असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. तर कोविड काळात मुंबई पालिकेने केलेले काम खूप कौतुकास्पद होते. याची जागतिक आरोग्य संघटना असेल किंवा वर्ल्ड बँक यांनीही दखल घेतली, दुबई पेपरलेस झाले. त्याच धर्तीवर मुंबई महापालिका दुबईप्रमाणे पेपरलेस व्हावी. उत्तम जागतिक सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याच्या आदित्य ठाकरे यांच्या परिवर्तनशील पाऊलांचे खुप कौतूक वाटते. आता महापालिकेच्या सुविधांचा आज मुंबईकरांना घरी बसून लाभ मिळेल, असे म्हणत मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी आनंद व्यक्त केला.

bmc mumbai1

( हेही वाचा : भूमिगत जल बोगद्याच्या कामात ‘मुंबई’चा जगात दुसरा क्रमांक! )

देशातील हा पहिलाच उपक्रम

कोरोनाकाळात मनुष्य संपर्क विरहीत काम करताना जन्मापासून मृत्यूपर्यंतची एकूण एक प्रमाणत्रे या व्हॉटसॲप सुविधेद्वारे उपलब्ध होतील. मुंबईकरांना ही सुविधा उपलब्ध करून देतांना खुप आनंद आणि समाधान वाटते, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. आज अतिशय चांगला उपक्रम सुरु होत आहे. मागील काही महिन्यांसाठी यासाठी खूप मेहनत घेण्यात येत होती. आज या सुविधेमुळे ८० पेक्षा अधिक सेवा सुविधा नागरिकांना हातातील मोबाईलवर मिळतील, काही सेकंदात नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण होईल. देशातला असा हा पहिलाच उपक्रम आहे. नागरिकांना ८० सेवा सुविधांचा लाभ घरी बसून मिळणे ही निश्चित कौतूकास्पद गोष्ट असून, देशात असा उपक्रम सुरु करणारी बहृन्मुंबई महानगरपालिका पहिली महापलिका आहे. ही माहिती देतांना महापालिकेच्या व व्हॉटसअप टीमच्या लोकांनी अचूक व परिपूर्ण माहिती मिळेल याची काळजी घ्यावी. असा सल्ला मुंबईचे आयुक्त डॉ. इक्बालसिंग चहल यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.