दिल्ली येथील प्रतिष्ठीत घराण्यातील मुस्लिम महिलांच्या छायाचित्राची त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चोरी करून त्या छायाचित्रात फेर बदल करून ते बुल्ली अॅप या वादग्रस्त अॅप वर टाकून या छायाचित्राची बोली लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तथाकथित निधर्मीवाद्यांनी आकांडतांडव सुरू केला आहे. मात्र हीच मंडळी आतापर्यंत हिंदू महिलांची अशीच बदनामी होत असताना त्यावर मात्र काही बोलत नाहीत. त्यामुळे अशा हिंदू महिलाही सायबर क्राईमच्या बळी ठरल्या आहेत. या महिलांना न्याय केव्हा मिळणार याविषयी अनेकांनी ट्विटरवर सवाल उपस्थित केला आहे.
हिंदू महिलाही वर्षानुवर्षे अशा सायबर क्राईमचा सामना करत आहेत. परंतु या प्रकरणांची माध्यमांनी दखल घेतली नाही. हिंदू स्त्रियांच्या प्रश्नांची दखल कोण घेणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. टेलिग्रामवर विशिष्ट चॅनेल तयार करण्यात आले होते, ज्यात फक्त हिंदू मुलींचे फोटो शेअर केले जात होते. या ग्रुपमध्ये हिंदू मुलींचे मूळ फोटोत बदल करून फोटो व्हायरल केले जात होते. असे प्रकार केवळ टेलिग्रामपुरते मर्यादित नाहीत. तर, हिंदू महिलांना टार्गेट करण्यासाठी किक, मेसेंजर, व्हॉट्सअॅप फेसबुकवर तत्सम गट सक्रिय आहेत.
( हेही वाचा : राज्यात ‘असे’ होतेय शिक्षणाचे इस्लामीकरण! )
माध्यमांकडून दखल नाही
बुल्ली अॅप प्रकरणाची देशभरात दखल घेण्यात आली आहे, तसेच या वादग्रस्त अॅपचे लोण मुंबईत पोहचताच मुस्लिम समुदायामध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. यामुळे या प्रकरणातील आरोपीला त्वरित तपास करत अटक करण्यात आली. परंतु याधीही अशा प्रकारची प्रकरणे हिंदू महिलांतच्या बाबतीत घडली तेव्हा कारवाई का केली नाही, असा सवाल समाज माध्यमांवर उपस्थित होत आहे. तसेच या प्रकरणाची कोणत्याच माध्यमांनीही दखल घेतलेली नाही.
Dear @DelhiPolice, @MumbaiPolice, @Rajeev_GoI & @AshwiniVaishnaw
These are the WhatsApp groups, targeting Hindu women by sharing & misusing their photos.
Links:
2. https://t.co/aiLLOJHhRy pic.twitter.com/HmokpJDGQF
— Anshul Saxena (@AskAnshul) January 5, 2022
हिंदू महिला टार्गेट
http://interfaithxxx.com या वेबसाइटने हिंदू महिलांविषयी अनेक कथा आणि खोट्या बातम्या देऊन त्यांना लक्ष्य केले होते. ही वेबसाइट गेल्या वर्षी काढून टाकण्यात आली होती. प्रसिद्ध विश्लेषक अंशुल सक्सेना यांनी इन्स्टाग्रामवर ‘मिशन टूथब्रश’ हा उपक्रम राबवत तब्बल ११७ इन्स्टाग्राम खाती बंद केली होती. यात भारत देशाविरोधी २५, मुलींचे फोटो असलेली ७, इस्लामिक विरोधी ४ तर, ८१ हिंदूविरोधी खाती मिशन टूथब्रश या उपक्रमाअंतर्गत २०२० मध्ये बंद करण्यात आली.
Join Our WhatsApp Community2) In 2020, I started Mission Toothbrush on Instagram
117 accounts removed
Anti-India accounts: 25
Accounts with photos of girls: 7
Anti-Islamic accounts: 4
Anti-Hindu accounts: 81Read usernames of accounts who shared photos of girls.
All 7 accounts were targeting Hindu girls pic.twitter.com/l0ocYvcY5s
— Anshul Saxena (@AskAnshul) January 5, 2022