Whatsapp new feature : मार्क झुकरबर्ग यांनी लाॅंच केले नवे रिॲक्शन फिचर

142

सध्या चॅटिंग करण्यासाठी व्हाॅट्सॲपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यासाठी या ॲपमध्ये वेळोवेळी नवे फिचर व्हाॅट्सॲप आणत असते. आता असेच एक भन्नाट फिचर व्हाॅट्सॲपने लाॅन्च केले आहे. व्हाॅट्सॲपमध्ये आपल्याला डिपी सेट करता येतो. तसेच मेसेज पाठवणे, स्टेटस अपलोड करणे अशा फिचर्सचा वापर अनेक लोक सध्या करतात, पण मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्गने नुकतीच व्हाॅट्सॲपच्या नव्या फिचरची घोषणा केली आहे. या फिचरमुळे आता इमोजीद्वारे रिॲक्शन्स देता येणार आहेत.

हे आहेत इमोजी

मागच्या अनेक दिवसांपासून व्हाॅट्सॲपचे युझर्स उत्सुकतेने वाट पाहत होते. व्हाॅट्सॲपच्या आधीच्या व्हर्जनमध्ये इमोजीचा वापर केवळ चॅटिंगमध्ये केला जात होता, पण आता नव्या फिचरमुळे तुम्ही मेसेजला रिॲक्शन देऊ शकणार आहात. मार्क झुकरबर्गने हे फिचर लाॅंच झाल्याबाबत माहिती दिली आहे. मार्कने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सहा इमोजी दिसत आहेत. यामध्ये थम्सअप, हार्ट, लाफिंग, सरप्राइज, सॅड आणि नमस्कार असे इमोजी आहेत.

( हेही वाचा: व्हॉट्सअॅप यूझर्ससाठी ब्रेकिंग न्यूज; आता नोटीफिकेशनमध्ये दिसणार फोटो आणि अनेक भन्नाट फिचर )

व्हाॅट्सॲपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करावे लागणार

हे नवे फिचर वापरण्यासाठी व्हाॅट्सॲपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करावे लागणार आहे. तुमचे व्हाॅट्सॲप अकाऊंट अपडेट झाले की तुम्ही या सहा इमोजींचा वापर रिॲक्शन देण्यासाठी करु शकता. सध्या  मेसेजेसला रिप्लाय देण्यासाठी या इमोजीचा वापर करता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.