New Feature: व्हाॅट्सअॅपवरून आता पाठवा 25 जीबीची फाईल

130

सोशल मेसेजिंग अॅप व्हाॅट्सअॅपच्या युझर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच महत्त्वपूर्ण अपडेट देणार असून, त्याचा युझर्सला मोठा फायदा होणार आहे. व्हाईस किंवा व्हिडिओ काॅलवर एकाचवेळी आता 32 युझर्स जोडता येतील. तसेच, तब्बल 25 जीबी एवढी मोठी फाईलदेखील पाठवता येणार आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकच्या माध्यामातून ही माहिती दिली आहे. व्हाॅट्सअॅपवर कम्युनिटिज सुरु करण्यात येत आहे. यामुळे ग्रुप्स आता अधिक चांगले होतील. याशिवाय इतर अनेक सुविधा वापरकर्त्यांना मिळणार आहेत, असे झुकरबर्ग म्हणाले. लवकरच नव्या अपडेट्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत.

( हेही वाचा: Twitter Down: जगभरातील अनेक भागात ट्विटर डाऊन! युजर्स हैराण, अकाऊंट ऍक्सेस करण्यात अडचणी )

व्हाॅट्सअॅप युझर्स

  • 500 कोटी जगभरात
  • 40 कोटी भारतात
  • एका ग्रुपमध्ये आता 1024 सदस्य जोडता येतील. ही मर्यादा ऑक्टोबरमध्येच 256 वरुन वाढवून 512 इतकी करण्यात आली होती.
  • व्हाईस किंवा व्हिडिओ काॅलवर एकाच वेळी 32 जणांना जोडता येईल
  • 25 जीबीपर्यंत फाईल पाठवता येईल. सध्या केवळ 16 एमबीपर्यंत मर्यादा आहे.
  • युजर्सना आता इन चॅट पोल ही नवी सुविधा मिळणार आहे. त्यामुळे ग्रुपमध्ये एखाद्या विषयावर सर्वेक्षण करता येणार आहे.
  • या सुविधांबाबत एप्रिलमध्ये घोषणा करण्यात आली आहे. काही आठवड्यांतच वापरकर्त्यांना अपडेट्सच्या माध्यमातून त्या वापरता येतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.