गेल्या अनेक दिवसांपासून व्हाॅट्सअॅपचे वापरकर्ते ज्या फीचरची वाट बघत होते ते अखेर आले आहे. व्हाॅट्स अॅपची मूळ कंपनी मेटाने निवडक वापरकर्त्यांसह पोल फीचरची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर बुधवारपासून ते अॅंड्राॅइड आणि आयओएस दोन्हींसाठी जारी करण्यास सुरुवात केली.
व्हाॅट्सअॅप पोल
हे नवीन फीचर ग्रुप चॅटिंगमध्ये आणि वैयक्तिक चॅटिंगदरम्यानही वापरले जाऊ शकते. हे फीचर फक्त ग्रुप्ससाठीच येणार असल्याचे आधी सांगितले जात होते. याद्वारे तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रश्नावर लोकांचे मत किंवा प्रतिक्रिया जाणून घेऊ शकता. पोलवर उत्तरासाठी 12 पर्याय देता येतात. त्यापैकी कोणत्याही पर्यायांवर क्लिक करुन उत्तर देऊ शकतो.
( हेही वाचा हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराणी फूटबाॅलपटूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार; व्हिडीओ होतोय व्हायरल )
असा करा वापर ?
- सर्वप्रथम व्हाॅट्सअॅप अपडेट करा
- व्हाॅट्स अॅप ओपन करा आणि तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये किंवा वैयक्तिक चॅटिंगसाठी पोल घ्यायचा असेल तिथे क्लिक करा.
- अॅंड्राईड वापरकर्त्यांनी चॅटिंग करण्यासाठी मेसेज टाइप करावा लागतो त्याच्या बाजूलाच असलेल्या अटॅचमेंटच्या चिन्हावर क्लिक करावे.
- आयओएस वापरकर्त्यांनीही मेसेज टाइप करावा लागतो त्याच्या बाजूलाचा असलेल्या प्लस चिन्हावर क्लिक करावे.
- आता तुम्हाला लोकेशन, काॅन्टॅक्ट्स या पर्यायांसह सर्वात खाली पोल हा नवा पर्याय दिसेल.
- अखेरीस सेंड बटणावर क्लिक करा.