जगात वाहनाची पहिली नोंदणी कधी आणि कुठे झाली होती? जाणून घ्या…

85
आज जगभरात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अगदी १०-१२ चाकांचे ट्रेलर चालत असतात. जगभरातील वाहनांची संख्या आज अब्जावधीच्या संख्येत असू शकते. अशा प्रत्येक वाहनाला क्रमांक दिला जातो. याकरता प्रत्येक देशाची वाहनांना क्रमांक देण्याची निरनिराळी पद्धत आहे. यात आजवर कोणत्याही वाहनाला सारखा क्रमांक आलेला नाही, हेच वाहनांना दिले जाणाऱ्या क्रमांकाचे वैशिष्ट्य आहे. वाहनाला क्रमांक देण्याची पद्धत कधी आणि कुठे सुरु झाली, याची कहाणी मजेशीर आहे.

फ्रान्स पहिला देश ठरला 

१४ ऑगस्ट १८९३ रोजी फ्रान्स हा पहिला देश होता ज्याने पॅरिस पोलीस अध्यादेश लागू करून वाहनांना नंबर प्लेट लावणे सुरु केले. त्यानंतर १८९६ साली जर्मनीने वाहनांना नंबर देणे सुरु केले. तर १८९८ मध्ये नेदरलँडने ‘ड्रायव्हिंग परमिट’ नावाने वाहनांना क्रमांक देण्याची पद्धत सुरु केली. अमेरिकेत प्रत्येक राज्याची वाहनाची स्वतंत्र क्रमांकाची पाटी लावण्यास सुरुवात केली. १९०१ साली पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळे अंक असलेली नंबर प्लेट न्यूयॉर्कमध्ये लावण्यात आली.

भारतात १९९०पासून लागू झाली नवी प्रणाली 

भारतात सध्या सर्व राज्ये आणि शहरांमध्ये वाहनांना दिले जाणारे क्रमांक ही नवीन प्रणाली 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला लागू झाली. या अंतर्गत ज्या राज्यात वाहन नोंदणीकृत आहे त्या राज्यासाठी दोन अक्षरी ओळख देण्यात आली आहे. ज्या राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) येथे वाहन नोंदणीकृत केले जाईल, ते ओळखण्यासाठी दोन नंबर कोड दिला जातो. तसेच अल्फाबेटच्या परिभाषित क्रमांक दिला जातो.
उदाहरणार्थ, “MH 10 EL 5311” च्या बाबतीत, “MH” म्हणजे महाराष्ट्र, “10” म्हणजे सांगली शहर RTO, आणि “EL 5311” हा मालिका आणि अनुक्रमांक दर्शवतो.
यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत, देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे, वाहन निर्मितीमध्ये देश स्वयंपूर्ण होवू लागला आहे, त्यामुळे वाहनांची संख्याही वाढत चालली आहे, अशा वेळी नव्या वाहन नोंदणीसाठी सिरीयल देखील त्याच गतीने संपत आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.