1 मे महाराष्ट्राचा, मग इतर राज्यांचे वाढदिवस कोणते? वाचा एका क्लिकवर

माणसाचा जसा वाढदिवस साजरा केला जातो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशातील राज्यांचे देखील वाढदिवस साजरे केले जातात. 1 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. देशात सध्या महाराष्ट्रासह 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्य देखील आपापले दिन साजरे करत असतात. ही राज्ये कोणत्या दिवशी आपले वाढदिवस साजरे करतात?

1 नोव्हेंबर

1956 च्या राज्य पुनर्ररचना कायद्यानुसार, 1 नोव्हेंबर 1956 रोजी देशात एकूण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात होते. यामधील काही राज्यांची नावे कालांतराने बदलण्यात आली, तर काही राज्यांचे विभाजन करण्यात आले. यापैकी ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश 1 नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करतात-

राज्ये

दिल्ली
आंध्र प्रदेश
केरळ
मध्य प्रदेश
तामिळनाडू(मद्रास)
कर्नाटक(म्हैसूर)

केंद्रशासित प्रदेश

लक्षद्वीप
पॉंडेचेरी(पुद्दुचेरी)
अंदमान आणि निकोबार बेटे

(हेही वाचाः पवार आणि राष्ट्रपती राजवटीचं ‘हे’ आहे जूनं ‘कनेक्शन’, महाराष्ट्रात त्याचं पुन्हा होणार ‘दर्शन’?)

छत्तीसगढ

1 नोव्हेंबर 2000 रोजी मध्य प्रदेशातून छत्तीसगढ वेगळे करण्यात आले.

पंजाब आणि हरियाणा

1 नोव्हेंबर 1966 रोजी पंजाबमधून हरियाणा वेगळे करण्यात आले. त्यामुळे या दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस देखील 1 नोव्हेंबर आहे.

गुजरात

1 मे 1960 रोजी बॉम्बे पुनर्ररचना कायद्यानुसार बॉम्बे प्रांतातून गुजरात वेगळे झाले. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातचा स्थापना दिवस सुद्धा 1 मे आहे.

गोवा

भारतीय सेनेने पोर्तुगिजांना हुसकावून लावत गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा 19 डिसेंबर रोजी मिळाला. त्यानंतर 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे हे दोन्ही दिवस गोव्यात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

ओडिशा

1 एप्रिल 1936 रोजी ओरिसाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर 2011 मध्ये त्याचे नाव ओडिशा करण्यात आले.

(हेही वाचाः भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? माहीत आहे का?)

दादरा, नगर हवेली, दीव दमण

दादरा नगर हवेली आणि दीव दमण या दोन वेगळ्या केंद्रशासित प्रदेशांना 26 जानेवारी 2020 रोजी एकत्र करण्यात आले.

झारखंड

15 नोव्हेंबर 2000 रोजी बिहार राज्यातून झारखंड हे राज्य वेगळे करण्यात आले.

बिहार

1912 साली इंग्रजांनी बंगाल प्रांतातून बिहार वेगळे केले. 22 मार्च हा बिहारचा स्थापना दिवस आहे.

राजस्थान

जोधपूर, जयपूर, जैसलमेर आणि बिकानेर ही संस्थाने एकत्रित करुन राजस्थान हे राज्य 30 मार्च 1949 रोजी स्थापन करण्यात आले.

उत्तर प्रदेश

इंग्रजांच्या राजवटीत युनायटेड प्रोविन्स म्हणून ओळखल्या जाणा-या प्रांताचे नाव 24 जानेवारी 1950 रोजी उत्तर प्रदेश करण्यात आले.

उत्तराखंड

9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तर प्रदेशातून उत्तरांचल हे राज्य वेगळे करण्यात आले. 2006 रोजी त्याचे नाव उत्तराखंड असे बदलण्यात आले.

(हेही वाचाः युद्धातही देशाच्या मदतीला धावून आली होती ‘एसटी’)

जम्मू काश्मीर आणि लडाख

विशेष दर्जा मिळालेल्या जम्मू-काश्मीर राज्याचे अलीकडेच विभाजन करुन 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले.

हिमाचल प्रदेश

1956 रोजी केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर हिमाचल प्रदेश अधिनियम 1971 नुसार 25 जानेवारी 1971 रोजी हिमाचल प्रदेशला राज्याचा दर्जा देण्यात आला.

पश्चिम बंगाल

पूर्व पाकिस्तान(सध्याचा बांग्लादेश)मधून वेगळे झाल्यानंतर पश्चिम बंगाल हे राज्य अस्तित्वात आलं. 20 जून 1947 हा बंगालचा स्थापना दिवस आहे.

सिक्कीम

हे एक स्वतंत्र राज्य होते. पण 1975 रोजी झालेल्या मतदानात सिक्कीमच्या जनतेने भारतात येण्याचे ठरवले. 16 मे हा सिक्कीमचा स्थापना दिवस आहे.

(हेही वाचाः पाऊस पडला म्हणून सचिन ‘ती’ मॅच खेळू शकला आणि त्याने पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूला ‘धू-धू धुतला’)

मेघालय, त्रिपुरा आणि मणीपूर

उत्तर-पूर्व राज्य पुनर्ररचना कायद्यानुसार, 21 जानेवारी 1972 रोजी या तीन राज्यांची स्थापना झाली.

आसाम

2 डिसेंबर 1928 ला आसामला राज्याचा दर्जा देण्यात आला.

नागालँड

1 डिसेंबर 1963 ला नागालँडला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

मिझोराम

1972 रोजी या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. भारत सरकार आणि मिझो नॅशनल फ्रंटमध्ये सामंजस्य करार झाल्यानंतर 20 फेब्रुवारी 1987 रोजी मिझोराम हे भारतातील 23वे राज्य म्हणून अस्तित्वात आले.

अरुणाचल प्रदेश

1972 रोजी केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापन झालेले अरुणाचल प्रदेश 20 फेब्रुवारी 1987 रोजी भारताचे 24वे राज्य बनले.

(हेही वाचाः ‘या’ चुका झाल्या नसत्या तर सचिनच्या नावावर 102 सेंच्युरी असत्या)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here