केव्हा असतो World Hepatitis Day आणि काय आहे या दिवसाचं महत्व?

132
केव्हा असतो World Hepatitis Day आणि काय आहे या दिवसाचं महत्व?
केव्हा असतो World Hepatitis Day आणि काय आहे या दिवसाचं महत्व?

हिपॅटायटीस हा एक गंभीर आजार आहे ज्याबद्दल लोकांना जागरूक करणे महत्वाचे आहे. या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी World Hepatitis Day ला विशेष महत्त्व आहे. हिपॅटायटीस बी विषाणू (एचबीव्ही) चा शोध लावणारे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. बारुच ब्लुमबर्ग यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.

(हेही वाचा- Delhi Coaching Incident: कोचिंग सेंटरमधील दुर्घटनेनंतर विद्यार्थी संतप्त; विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात रोष)

हिपॅटायटीस हा यकृताशी संबंधित एक गंभीर आजार आहे. यामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते. हिपॅटायटीस हा एक आजार आहे जो यकृतावर परिणाम करतो आणि त्यात जळजळ होतो. हिपॅटायटीस विषाणूंचे पाच प्रकार आहेत. यामध्ये हेपेटायटीस ए, बी, सी, डी, ई यांचा समावेश आहे. हिपॅटायटीसचे पाचही प्रकार धोकादायक आहेत. (World Hepatitis Day)

जागतिक हिपॅटायटीस दिवस दरवर्षी २८ जुलै रोजी या गंभीर आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. त्याचबरोबर लोकांना या आजाराच्या प्रतिबंध आणि उपचारांच्या पर्यायांबद्दल जागरूक केले जाते. आपल्या देशात हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत असून, त्यामुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. हा आजार होऊ नये म्हणून लोकांनी सजग आणि जागरूक राहणे आवश्यक आहे आणि बचाव करण्यासाठी लसीकरण केले पाहिजे. (World Hepatitis Day)

(हेही वाचा- Crime : गाडी दुरुस्त करताना सराफा व्यावसायिकाकडून 60 लाखांचे सोने लुटले)

जागतिक हिपॅटायटीस दिन २०१० मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. मे २०१० मध्ये ६३ व्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे हिपॅटायटीस-बी विषाणूचा शोध लावणारे आणि नोबेल पारितोषिक विजेते प्रा. बारुख सॅम्युअल ब्लूमबर्ग यांचा वाढदिवस “जागतिक हिपॅटायटीस दिवस” म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. (World Hepatitis Day)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.