लसीचा पहिला डोस घेतल्यावर कोरोना झाल्यास कधी घ्याल ‘दुसरा’ डोस? ‘एम्स’च्या तज्ज्ञांनी दिले उत्तर

पहिल्या डोसनंतर कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान(एम्स)च्या तज्ज्ञांनी हा संभ्रम दूर केला आहे.

1 मे पासून होणा-या लसीकरण मोहिमेला देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पण लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर सुद्धा काही जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. जर पहिल्या डोसनंतर कोरोनाची लक्षणे आढळून आली तर मग दुसरा डोस कधी घ्यावा, याबाबतीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण आता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान(एम्स)च्या तज्ज्ञांनी हा संभ्रम दूर केला आहे.

काय आहे प्रश्न?

सामान्यतः कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुस-या डोसमधील कालावधी हा 6 ते 8 आठवडे इतका आहे. तर कोवॅक्सिनसाठी हा कालावधी 4 ते 6 आठवडे आहे. पण लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही काहींच्या शरीरात कोरोनाची लक्षणे दिसत आहेत किंवा त्यांना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे अशावेळी दुसरा डोस हा ठरलेल्या कालावधीत घेणे योग्य आहे का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. याबाबत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान(एम्स)चे कोविड सेंटर प्रमुख डॉ. अंजन त्रिखा यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. पीआयबी महाराष्ट्रने ही माहिती ट्वीट करत प्रसिद्ध केली आहे.

(हेही वाचाः सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्यांसाठी ‘आयुष-६४’चे वरदान!)

कधी घ्याल दुसरा डोस?

लसीचा पहिल्या डोसनंतर कोविडची लक्षणे दिसली किंवा विषाणूचा संसर्ग झाला, तर त्यातून बरे झाल्यानंतर 4 ते 6 आठवड्यांनी लसीचा दुसरा डोस घेणे योग्य असल्याचे, डॉ. त्रिखा यांनी सांगितले आहे. असे केल्यास लसीचा योग्य परिणाम दिसून येऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यावर, त्यातून पूर्णपणे बरे व्हा आणि मगच दुसरा डोस घ्या, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here