LPG सिलिंडरचा शोध लागण्यापूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जायचा. परंतु यामुळे घरातील गृहिणाला धूराचा त्रास तसेच शेतातील लाकडे तोडून चुली पेटवाव्या लागत असल्यामुळे पर्यावरणाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. भारत स्वतंत्र झाल्यावर शहरी भागात एलपीजी सिलिंडर म्हणजेच गॅसचा वापर सुरू झाला. मात्र, मागच्या अनेक दिवसांपासून इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. देशभरात महागाई वाढली असून नव्या दरांनुसार, आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती हजार रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. या LPG गॅस सिलिंडरचा शोध नक्की केव्हा लागला याविषयी आपणा जाणून घेऊया…
( हेही वाचा : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा २८ मे पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा!)
एलपीजी गॅसचा शोध केव्हा लागला?
एलपीजी गॅसचा शोध डॉ. वॉल्टर स्नेलिंग यांनी १९१० रोजी लावला. त्यानंतर वॉल्टर यांनी American Gasol Company ची सुरूवात करून एलपीजी गॅसची विक्री केली. तर, भारतात एलपीजीची सुरूवात १९५५ मध्ये मुंबईत बर्मा ऑइल कंपनी मार्फत करण्यात आली परंतु एलपीजीचे वितरण १९६५ पासून कोलकातामध्ये इंडियन ऑईल या कंपनीकडून करण्यात आले.
एलपीजीचा फुल फॉर्म
लिक्विड पेट्रोलियम गॅस (Liquefied petroleum gas) हा एलपीजीचा फुल फॉर्म आहे.
एलपीजी म्हणजे काय?
एलपीजी हे ज्वलनशील हाइड्रो कार्बनचे मिश्रण आहे. एलपीजीचा वापर आपण अन्न शिजवण्यासाठी किंवा गाड्यांमध्ये करू शकतो. एलपीजी प्रोपिन आणि ब्युटेन अशा दोन घटकांपासून बनला आहे. एलपीजी हा गॅस नसून द्रवरूप वायू पदार्थ आहे. लोखंडाच्या टाकीत भरताना एलपीजी द्रव म्हणून भरला जातो.
एलपीजी वैशिष्ट्ये
- स्वयंपाक करताना एलपीजी गॅसमुळे प्रदूषण होत नाही. यामुळे तुमच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
- एलपीजीमुळे कोणत्याही प्रकारचे विषारी पदार्थ तयार होत नाहीत. यामुळे पृथ्वीच्या ओझोन थराला कोणतीही हानी होत नाही.
- सिलिंडरमध्ये दाबून कॉम्प्रेसद्वारे एलपीजी भरला जातो. सिंलिंडरमध्ये एलपीजी द्रवरुप वायूच्या स्वरुपात असतो.
- एलपीजी गॅस पाण्यापेक्षा अर्धा तर हवेपेक्षा दुप्पट जड आहे.
- एलपीजी रंगहीन आणि गंधहीन आहे.