वाचकहो, जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या आणि आरोग्याच्या अधिकाराबद्दल जागरुक केले जाते. जागतिक आरोग्य दिन हा जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त साजरा केला जातो. दरवर्षी या दिवसाच्या स्मरणार्थ, WHO जागतिक आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करते.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ची स्थापना ७ एप्रिल १९४८ मध्ये झाली. WHO ही युनायटेड नेशन्स एजन्सी आहे जी आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी, जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आरोग्यासंबंधी असुरक्षित लोकांची सेवा करण्यासाठी राष्ट्रे, भागीदार आणि लोकांना जोडते, जेणेकरून प्रत्येकाला चांगले आरोग्यात्मक उपचार मिळू शकतील.
(हेही वाचा – Mulund Bird Park : मुलुंडमधील बर्ड पार्कसाठी बीएमसीने केली प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती)
आरोग्य दिनाचा उद्देश जागतिक आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे आणि विषमता दूर करून आरोग्य समानतेला प्रोत्साहन देणे असा आहे. या दिवशी लोकांना चांगल्या आरोग्याचे महत्त्व आणि फायदे याबद्दल प्रबोधन केले जाते. वंचित समुदाय, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये रोगांचे ओझे कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
WHO चे पूर्ण नाव World Health Organization असे आहे. जागतिक आरोग्य संघटना ही आरोग्यासाठी संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जागतिक आरोग्य दिन 2024 साठी एक थीम निवडण्यात आली आहे. ‘माझे आरोग्य, माझा हक्क’ ही यंदाची थीम आहे. आरोग्याशी संबंधित सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे. तर आपणही हलगर्जीपणा न करता, आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या तसेच समाजाच्या आरोग्याबाबत जागरुक राहिलं पाहिजे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community