महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे, हे जरी दिलासादायक असले तरीही कोरोना पूर्णतः गेलेले नाही. अशातच कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून नागरिकांना मास्क सक्तीचे केले आहे. मात्र महाराष्ट्र कधी मास्क मुक्त होणार यासंदर्भात बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राजेश टोपे कोल्हापूरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पाश्चिमात्य देशांनी मास्क फ्री केलं आहे. हे का केलं आहे याचा अभ्यास करणं गरजेचे आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या टास्क फोर्सला अशी विचारणा करण्याबाबत चर्चा झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले राजेश टोपे
राज्यात आता कोरोनाचे निर्बंध कडक करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे हे कोरोनाचे निर्बंध कमी करण्यात येतील. याबाबतीतील विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला असून महाराष्ट्र आजच मास्क फ्री केला पाहिजे, असे अजिबात नाही. ज्या देशांनी मास्क मुक्त केले त्याचं शास्त्र नेमकं काय होत, हे जाणून घेणं आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र आता तरी मास्क मुक्ती होणार नाही, असेही राजेश टोपेंनी सांगितले.
(हेही वाचा – नागपूरात काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये का झाल राडा! वाचा… )
अनेक रूग्णालयांनी पुढे येऊन लस खरेदी केली. आता लस एक्सपायरी होत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. मोठ्या कंपन्यांनी या लसी घ्याव्यात. त्यांची लस आधी घ्यावी आणि त्यांना दुसऱ्या द्याव्यात याबाबत सुद्धा केंद्राशी आणि राज्याशी बोलेन, असे राजेश टोपे यांनी कोरोना लसी वाया जात असलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community