नोटांवरच्या ‘या’ छोट्या अक्षरांमध्ये दडलंय मोठं ‘गुपीत’, खिशातल्या नोटा काढून चेक करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा शिक्का असलेल्या आणि आरबीआयच्या गव्हर्नरची सही असलेल्या नोटाच भारतात चलन म्हणून चालतात. खरं तर नोटा आणि कागदाचा कपटा यांच्यात काहीच अंतर नाही. पण या आरबीआयच्या सही शिक्क्यामुळे नोटांना एक किंमत येते आणि त्या खिशात ठेवणा-यांचा ‘भाव’ वाढतो.

कितीही म्हटलं तरी नोटांचा पाऊस कधीच पडत नसतो. त्यासाठी नोटा या छापाव्याच लागतात. या नोटा छापण्यासाठी भारतात नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी या चार ठिकाणी छापखाने आहेत. जसं प्रत्येक माणसाची ओळख सांगणारं एक आयडी कार्ड असतं, तसंच या नोटांवर असलेल्या छोट्या इंग्रजी अक्षरांमुळे नोटा नेमक्या कुठल्या छापखान्यात छापण्यात आल्या आहेत, ते आपल्याला कळतं.

(हेही वाचाः तुमच्या खिशातली नाणी कुठून आली आहेत, हे कसं ओळखाल? ही आहे ‘ट्रिक’)

नोटांचा सिरियल नंबर ज्याठिकाणी असतो त्याच्या मागे ही अक्षरं छापलेली असतात. या अक्षरांना Insets असं म्हटलं जातं. मग यावरुन नोटांचं जन्मठिकाण कसं ओळखायचं?

नाशिकमध्ये छापलेल्या नोटा

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये करन्सी नोट प्रेस हा 1928 साली स्थापन झालेला नोटा छापणारा भारतातला पहिला कारखाना. इथे छापण्यात आलेल्या नोटांच्या सिरियल नंबर मागे L,M,N,P,Q ही अक्षरं छापलेली असतात. Security Printing and Minting Corporation of India(SPMCIL) या सरकारी कंपनीकडे या प्रेसची मालकी आहे.

(हेही वाचाः ‘ही’ आहे इंग्रजांच्या काळातली भारताची पहिली ‘आत्मनिर्भर’ बँक)

देवास येथील नोटा

मध्य प्रदेशातील देवास येथे बँक नोट प्रेस हा छापखाना 1975 पासून सुरू झाला. इथे छापलेल्या नोटांच्या सिरियल नंबर मागे E,F,G,H,K ही अक्षरं छापलेली असतात. या प्रेसची मालकी सुद्धा SPMCIL कडे आहे.

(हेही वाचाः भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? माहीत आहे का?)

म्हैसूरमध्ये छापलेल्या नोटा

कर्नाटकातील म्हैसूर येथे 1999 साली बँक नोट प्रेस स्थापन झाली. इथे तयार होणा-या नोटांच्या सिरियल नंबर मागे A,B,C,D ही अक्षरं छापली जातात. ज्या नोटेच्या सिरियल नंबर मागे कुठलंही अक्षर छापलेलं नसेल ती नोटसुद्धा इथेच तयार झालेली आहे. आरबीआयची उपसंस्था असलेल्या Bharatiya Reserve Bank Note Mudran Private Limited (BRBNMPL) कडे या प्रेसची मालकी आहे.

(हेही वाचाः युद्धातही देशाच्या मदतीला धावून आली होती ‘एसटी’)

सालबोनी येथील नोटा

पश्चिम बंगालमधील सालबोनीत असलेल्या बँक नोट प्रेसमध्ये छापण्यात आलेल्या नोटांच्या सिरियल नंबर मागे R,S,T,U,V,W ही अक्षरं छापलेली असतात. 2000 साली हा छापखाना सुरू झाला असून, त्याची मालकी BRBNMPL कडे आहे.

(हेही वाचाः देशात पहिल्यांदाच होणार ऑनलाईन जनगणना, अमित शहांची मोठी घोषणा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here