घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश लोक बॅंकांकडून कर्ज घेतात. कर्ज घेताना, व्याजदर किती आहे, यावरुन निर्णय घेतला जातो. मात्र, व्याजदराबाबत नेहमी एक प्रश्न निर्माण होतो की स्थिर दराने गृहकर्ज घ्यायचे की फ्लोटिंग रेटवर, नेमका काय निर्णय घ्यावा हे जाणून घेऊ…
फ्लोटिंग रेट
फ्लोटिंग कर्जाचा दर बाजारानुसार, कमी- जास्त होतो. आरबीआयने रेपो दरात वाढ केली की, बॅंका कर्ज महाग करतात. त्यावेळी तुमच्याही कर्जाच्या व्याजदरात वाढ होते. खालील परिस्थितीत तुम्ही फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज घेण्याचा विचार करु शकता.
- स्थिर होम लोनचे दर सामान्यत: फ्लोटिंग दरापेक्षा किंचित जास्त असतात. जर हा फरक जास्त असेल, तर तुम्ही त्याचा विचार करु शकता. याच्या मदतीने व्याजाचे पैसे वाचवू शकता.
- येत्या काळात व्याजदर कमी होऊ शकतात, असे वाटते तर…
- कर्जाच्या प्री- पेमेंटच्या बाबतीत तुम्हाला दंड टाळायचा असेल तर…
( हेही वाचा: राजद्रोहाचा पहिला गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला होता माहित आहे का? )
स्थिर दर
स्थिर दराच्या गृहकर्जामध्ये, कर्ज घेताना व्याजदर निश्चित केला जातो आणि कर्जाच्या संपूर्ण कालावधीत तोच राहतो. खालील परिस्थितीनुसार, तुम्ही स्थिर दराच्या गृहकर्जाची निवड करु शकता
- जर तुम्हाला वाटत असेल की, आता व्याजदर कमी होणार नाही.
- तुमच्या कर्जासाठी सध्याच्या व्याजदराने भरावा लागणारा ईएमआय योग्य असेल तर…