महाराष्ट्र राज्याने ३१ जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे अधिकृत गीत जाहीर केले. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ असे या गीताचे बोल आहेत. देशात महाराष्ट्राशिवाय १२ राज्यांनी स्वतःचे राज्यगीत जाहीर केले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या राज्यगीताचे लेखक राजा बढे आहेत. राजा बढे यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. ते वीर सावरकर यांना आदर्श मानत होते.
आसाम राज्य पहिले राज्य होते ज्यांनी १९२७ साली राज्यगीत घोषित केले. आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशा, पु्दुचेरी, तामिळनाडू आणि उत्तराखंड अशा १२ राज्यांनी राज्यगीत जाहीर केले आहे. त्यातील केवळ उत्तराखंड राज्याचे राज्यगीत संस्कृत भाषेत आहे.
कोणत्या राज्याचे कोणते राज्यगीत?
आंध्र प्रदेश – राज्यगीत – मा तेलगू थालिकी, या राज्यगीताचे लेखक शंकरामबदी सुंदराचारी असून १९५६ साली हे गीत आंध्र प्रदेशचे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले.
आसाम – राज्यगीत – ओ मूर अपूणर देश, या राज्यगीताचे लेखक लक्ष्मीकांत बेझबरुआ असून १९२७ साली हे गीत
आसामचे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले.
बिहार – राज्यगीत – मेरे भारत के कांत हार, या राज्यगीताचे लेखक सत्य नारायण असून २०१२ साली हे गीत बिहारचे
राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले.
छत्तीसगड – राज्यगीत – अर्पा पैरी के धार, या राज्यगीताचे लेखक नरेंद्र देव वर्मा असून २०१९ साली हे गीत छत्तीसगडचे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले.
गुजरात – राज्यगीत – जय जय गरवी गुजरात, या राज्यगीताचे लेखक नर्मदाशंकर दवे असून २०११ साली हे गीत गुजरातचे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले.
कर्नाटक – राज्यगीत – जय भारत जननीयां तनुजाते जय हे कर्नाटक माते, या राज्यगीताचे लेखक कुपाली व्यंकटप्पा पुटप्पा असून २००४ साली हे गीत कर्नाटकचे राज्यगीत म्हणून जाहीर झाले.
मध्य प्रदेश – राज्यगीत – मेरा मध्य प्रदेश, या राज्यगीताचे लेखक महेश श्रीवास्तव असून २०१० साली हे गीत मध्य प्रदेशचे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले.
मणिपूर – राज्यगीत – सेने लिबेक मणिपूर, या राज्यगीताचे लेखक बी. जयंतकुमार शर्मा असून २०२१ साली हे गीत मणिपूरचे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले.
ओडिसा – राज्यगीत – बंदे उत्कला जाननी, या राज्यगीताचे लेखक लक्ष्मीकांत पत्रा असून २०२० साली हे गीत ओडिशाचे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले.
पद्दुचेरी – राज्यगीत – तमिळ थई वेल्थू, या राज्यगीताचे लेखक भारती दसन असून २००७ साली हे गीत पद्दुचेरीचे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले.
तमिळनाडू – राज्यगीत – तमिळ थई वेल्थू, या राज्यगीताचे लेखक मनोन्ममानियसुंदरम पिल्लाई असून २०२१ साली हे गीत तमिळनाडूचे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले.
उत्तराखंड – राज्यगीत – उत्तराखंड देवभूमि मातृभूमि, शत शत वंदन अभिनन्दन। दर्शन,संस्कृति, धर्म, साधना, श्रम रंजीत तेरा कण कण, या राज्यगीताचे लेखक हेमंत भिष्ट असून २०१६ साली हे गीत उत्तराखंडचे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले.
Join Our WhatsApp Community