आता 5G इंटरनेट येतेय, तुमच्या स्मार्ट फोनमध्ये दिसेल का? प्रोसेसर आताच तपासा 

142

केंद्र सरकारने नुकतेच 5G स्पेक्ट्रमचा लिलाव केला आहे. यात एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन कंपन्यांनी यात बाजी मारली आहे. केंद्र सरकारला मात्र यातून तब्बल दीड लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. मात्र यासाठी सध्या अस्तित्वात असलेले स्मार्ट फोन या 5G इंटरनेटसाठी उपयोगी ठरणार आहेत का, हेही महत्वाचे आहे. त्यासाठी सध्या तुमच्याकडे असलेला मोबाईल फोन यासाठी अपडेटेड आहे का की त्यासाठी कोणता मोबाईल घ्यावा लागेल, याकरता तुमच्या मोबाईलचा प्रोसेसर आधी तपासावा लागेल.

कसा तपासाल तुमच्या मोबाईलचा प्रोसेसर? 

5G सपोर्टसाठी तुमच्या फोनमध्ये कंपीटिबल प्रोसेसर असायला हवे. तुम्ही सोप्या पद्धतीने तपासू शकता. त्यासाठी सेटिंगमध्ये अथवा अबाऊट फोन या पर्यायावर जा…त्यानंतर तुम्हाला हार्डवेअर सेक्शनमध्ये जावे लागेल.  तुमच्या फोनमध्येही खाली दिलेला चिपसेट असेल तर तुमच्या फोनमध्ये 5G काम करेल.

(हेही वाचा जनप्रबोधनानंतर डिजिटल क्रांती झाली असती, तर सायबर गुन्हे घडलेच नसते! काय म्हणतायेत सायबर तज्ज्ञ? )

कोणता प्रोसेसर 5G ला करेल सपोर्ट!   

Qualcomm : Snapdragon 865, Snapdragon 865+, Snapdragon 870, Snapdragon 888, Snapdragon 888+, Snapdragon 8 Gen 1, Snapdragon 8+ Gen 1 Snapdragon 695, Snapdragon 765/765G, Snapdragon 750/750G, Snapdragon 768/768G, Snapdragon 778/778G/778+

MediaTek : MediaTek Dimensity सीरीजमध्ये Dimensity 700 पासून Dimensity 9000 पर्यंत. MediaTek Helio-सीरीज आणि दुसऱ्या सीरीजच्या चिपसेट्स 5G ला सपोर्ट करत नाहीत. Samsung: Exynos 9820, Exynos 9825, Exynos 990, Exynos 2100, Exynos 2200

कोणत्या ब्रँडच्या स्मार्टफोन्समध्ये 5G नेटवर्क्स दिसेल? 

  • Apple – iPhone 12 सीरीज, iPhone 13 सीरीज, iPhone SE 2022
  • Samsung – Galaxy S-series (S20 आणि पुढील सीरीज ), Galaxy S20 FE 5G, Galaxy S21 FE 5G, Select A-सीरीज, M-सीरीज मॉडल्स.
  • OnePlus – OnePlus 8-सीरीज, OnePlus 9 सीरीज, OnePlus 10-सीरीज, OnePlus Nord-सीरीज
  • Xiaomi – Xiaomi 12-सीरीज, Xiaomi 11-सीरीज, Mi 10-सीरीज, Redmi Note 11 Pro+, Redmi Note 11T, Redmi Note 10T
  • Poco – Poco F4 5G, Poco M4 5G, Poco M4 Pro 5G
  • Oppo – Reno 8 सीरीज, Reno 7 सीरीज, Reno 6 सीरीज, Select Oppo A-सीरीज, K-सीरीज, F-सीरीज फोन्स
  • Vivo – V21, V21e, V23-series, T1-series, X60-series, X70-series, X80-series
  • iQOO – iQOO 9 series, iQOO 7-series, iQOO Z5, iQOO Z6, iQOO Z6 Pro
  • Realme – Realme GT series, Realme GT 2 series, Realme X7, Realme X7 Max, Realme X7 Pro, Realme Narzo 50 5G, Realme Narzo 30 5G, Realme 8/8s/8 Pro 5G, Realme 9/ 9 Pro 5G
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.