FASTag वापरताय? तर ‘या’ चुका करु नका, नाहीतर…

97

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने 2021 मध्ये सर्व गाड्यांना Fastag बंधनकारक केले असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू आहे. 15 फेब्रुवारी 2021च्या मध्यरात्रीपासून याची सुरुवात झाली आहे. दरम्यान, Fastagची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील रिचार्ज करू शकतात. मात्र कधी कधी Fastag चे रिजार्ज करताना पुरेशी माहिती नसल्याने उगाच नुकसान भोगावे लागते. त्यामुळे रिचार्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्ही स्वत:ची फसवणूक होणार नाही, हे जाणून घ्या…

  • पेटीएम आणि फोन पे सारख्या अॅपवरून रिचार्ज करताना तुम्हाला तुमचा गाडी क्रमांक टाकावा लागेल, जर तुम्ही चुकीचा नंबर टाकला तर तुमच्या खात्यातील पैसे कापले जातील. याशिवाय FASTag मध्ये रिचार्ज न होता तुम्हाला तिथे प्रत्यक्ष टोल भरावा लागेल.
  • FASTag चा रिचार्ज करण्यापूर्वी, तुमचा FASTag बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. हे रिचार्ज करण्यापूर्वी तुम्हाला बँक तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाते. तुम्ही चुकीचे तपशील दिले तरीही तुमचे रिचार्ज रद्द होईल आणि खात्यातून पैसेही वजा होऊ शकतात.
  • तुमचं वाहन तुम्ही विकले असेल तर त्याचे FASTag निष्क्रीय करा. नाहीतर तुमच्या खात्यातून पैसे वजा होऊ शकतात.
  • FASTag रिचार्ज करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा तुमचे अतिरिक्त पैसे कापले जात असतील तर तुम्ही NHAI च्या 1033 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

फास्टटॅग म्हणजे…

फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर असून हे स्टिकर गाडीच्या समोरच्या काचेवर लावलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. या टेक्नॉलीजीच्या मदतीने टोल नाक्यांवर लागलेले कॅमेरे स्टिकरवरील बारकोड स्कॅन करतात आणि FASTag खात्यातून टोलची रक्कम वजा केली जाते. रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होतो. टोलचे पैसे देण्यासाठी वाहनांची टोलनाक्यावर लाबंच लांब रांग लागते. मात्र आता FASTag अनिवार्य असल्याने थांबण्याचीही गरज भासणार नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या वेळेसह इंधनाची देखील बचत होईलच पण टोल प्लाझावर होणारी ट्रॅफिक जॅमच्या त्रासापासूनही सुटका होताना दिसतेय.

FASTag साठीचे नियम

1. FASTag मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व फोटो आवश्यक.

2. १ लाख रुपयांपर्यंत FASTag रिचार्ज करता येणार.

3. डेबिट-क्रेडिट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा.

4. टोल नाक्यावरून जाताना वाहनचालकांना वाहनाचा वेग कमी ठेवणे आवश्यक.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.