White House : व्हाइट हाऊसमध्ये भारताचा जयघोष, पाहुण्यांसाठी ‘ही’ मेजवानी, जाणून घ्या कारण

214
White House : व्हाइट हाऊसमध्ये भारताचा जयघोष, पाहुण्यांसाठी 'ही' मेजवानी, जाणून घ्या कारण
White House : व्हाइट हाऊसमध्ये भारताचा जयघोष, पाहुण्यांसाठी 'ही' मेजवानी, जाणून घ्या कारण

जागतिक महासत्ता भारताच्या रंगात रंगू लागली आहे. अनिवासी भारतीयांची संख्या तेथे वाढत असूनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी चक्क व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये ‘सारे जहॉं से अच्छा’ हे देशभक्तीपर गीत जो बायडेन यांनी मोठ्या उत्साहात गायले. एवढे करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी समोसा, पाणीपुरी मेजवानीही दिली. (White House)

व्हाईट हाऊसमध्ये भारतीय रंग

व्हाईट हाऊस (White House) मरीन बँडने आशियाई अमेरिकन लोकांसाठी ‘सारे जहॉंसे अच्छा हिंदुस्थान हमारा’ हे भारतीय देशभक्तीपर गाणे वाजवले. वार्षिक कार्यक्रमात पाहुण्यांना भारतीय स्ट्रिट फूडची मेजवानी देण्यात आली. ज्यात पाणीपुरी, समोसे आणि भारतीय मिठाईचा समावेश होता. (White House)

(हेही वाचा- Mumbai Crime : माटुंग्यातील प्रसिद्ध ‘म्हैसूर कॅफे’ मालकाच्या घरावर दरोडा, निवृत्त पोलीस दरोड्यात सामील; नेमकं काय घडलं?)

सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा गाणे वाजवून पाहुण्यांचं स्वागत

भारतीय देशभक्तीपर गीत व्हाईट हाऊसमध्ये (White House) गायले जाण्याची ही एका वर्षापेक्षा कमी कालावधीत दुसरी वेळ आहे. हे गाणे २३ जून २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौऱ्यादरम्यान वाजवण्यात आले होते. भारतीय आणि अमेरिकन समुदायाचे नेते अजय जैन भुटोरिया म्हणाले की, हा कार्यक्रम भारत-अमेरिकेचे संबंध मजबूत असल्याचे अधोरेखित करतो. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय-अमेरिकन नेते अजय भुटोरिया म्हणाले, ‘वाईट हाऊसच्या रोझ गार्डनमध्ये हा एक अदभूत उत्सव होता. संगीतकारांनी ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा’ हे गाणे वाजवून आमचे स्वागत केले. (White House)

मसालेदार पण स्वादिष्ट

रिसेप्शनमध्ये पाणीपुरी,समोसे आणि भारतीय मिठाई, स्ट्रिट फूडचाही समावेश होता. याबाबत भुतोरिया यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, गेल्या वर्षीही वार्षिक कार्यक्रमात येथे पाणीपुरी होती. यावर्षीही आम्ही त्यांच्या शोधात होतो आणि अनपेक्षितपणे हे पदार्थ आमच्या समोर आले. हे आमच्यासाठी आश्चर्यकारक होते. आपल्या मातीची चव मसालेदार होती, पण स्वादिष्ट होती. (White House)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.