ओमिक्रॉनचं 23 देशात थैमान! संसर्ग फैलण्याची शक्यता, WHO ची माहिती

155

सध्या संपूर्ण जगात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची चिंता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 23 देशात या ओमिक्रॉनने चांगलाच धुमाकूळ घातला असून पुन्हा एकदा कोरोनाच्या या व्हेरियंटची दहशत निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेकडून एक शक्यता वर्तविली जात आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसू यांनी सांगितले की, आतापर्यंत किमान 23 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रूग्ण नोंदवली गेली आहेत. ज्यामध्ये 6 WHO क्षेत्रांतील 5 देशांचा समावेश आहे. हा प्रसार आणखी वाढण्याची शक्याता आहे.

ओमिक्रॉन भारतातही दाखल?

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन भारतातही दाखल झाला असल्याची शक्यता आहे. काही दिवसांमध्ये त्याचा शोध लागेल अशी धक्कादायक माहिती आयसीएमआरचे साथीसंदर्भातील विभागाचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी दिली आहे. यासह ते असेही म्हणाले की, “भारतात ओमिक्रॉन आढळल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या व्हेरियंटची संक्रमणक्षमता पाहता काही दिवसात हे होण्याची शक्यता आहे. मात्र भारतात कोरोनाचं संकट पुन्हा निर्माण झाल्यास भारत पूर्णपणे सज्ज असेल.”

(हेही वाचा – भारत-रशिया AK-203 करारावर स्वाक्षरी! दिल्ली दौऱ्यात पुतिन-मोदींची पहिली भेट)

पहिल्यांदा ९ नोव्हेंबरला आफ्रिकन देशांमध्ये ओमिक्रॉनचं अस्तित्व आढळले. दक्षिण आफ्रिका आणि अन्य देशांतून काही महिन्यांत अनेक प्रवाशांनी जगभरात प्रवास केला आहे. त्यांच्यापैकी काही जणांना याची बाधा झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातही हा नवा व्हेरियंट आढळून येऊ शकतो, असेही ते म्हणाले. बुधवारी दुपारपर्यंत भारतात एकूण 11 आंतरराष्ट्रीय उड्डाणे वेगवेगळ्या विमानतळांवर उतरली आहेत. यामध्ये एकूण 3,476 प्रवासी होते. सर्व प्रवाशांच्या RT-PCR चाचण्या करण्यात आल्या असून, ज्यामध्ये 6 प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. बाधित रुग्णांचे नमुने जीनो सिक्वेन्सिंगसाठी पाठवले गेले आहेत, ज्याद्वारे त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की नाही यांची माहिती समोर येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.