जागतिक आरोग्याचा लेखाजोखा ठेवणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने नुकताच एक मोठा दावा केला आहे. मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियामध्ये आढळलेले भारतीय कंपनीचे आणखी कफ सिरप दूषित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. हे सिरप पंजाबमधील क्यूपी फार्माकेम या कंपनीचे असून हरियाणातील ट्रिलियन फार्मा ही कंपनी या सिरपचे वितरण करते.
( हेही वाचा : IPL 2023 : मुंबईचा दारूण पराभव, पण गुजरातला झाला फायदा! आयपीएल पॉईंट टेबलची स्थिती काय?)
WHO चा दावा काय?
क्यूपी फार्माकेम लिमिटेड कंपनीची औषधे दूषित असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. पंजाबमधील या कंपनीच सिरप वापरू नये असे आवाहन WHOने सदस्य राष्ट्रांना केले आहे.
आरोपावर कंपनी काय म्हणाली ?
जे कफ सिरप दूषित असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटना करत आहे, तेच कफ सिरप भारतात सुद्धा वितरीत करण्यात आले आहे. आतापर्यंत भारतातून या सिरपबद्दल कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. या शिवाय डबल्यूएचओने ज्या सिरपची तपासणी केली ते कालबाह्य झाले होते. कालबाह्य सिरपची चाचणी केल्यामुळे त्यांनी केलेला आरोप ग्राह्य धरता येणार नाही. पंजाब सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन विभाग आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने चाचणी करण्यासाठी कंपनीच्या औषधांचे नमुने घेतले आहेत. ही गुणवत्ता चाचणी सिरप पास करेल, असा विश्वास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर पाठक यांनी व्यक्त केला.
हे काही पहिल्यांदा होत नाही
- भारतीय बनावटीच्या औषधांवर WHO ने काही पहिल्यांदाच आरोप केलेला नाही. मागच्या वर्षभरात परदेशी संघटनांनी असे अनेक आरोप भारतीय कंपन्यांवर केले आहेत. मागच्या काही महिन्यांमध्ये हे आरोप करण्यात आले आहेत :
- एप्रिल २०२३ मध्ये यूएसएफडीएने चेन्नईतल्या एका फार्मा कंपनीवर आरोप केला होता. आरोप करणाऱ्याचे असे म्हणणे होते, की ग्लोबल फार्मानिर्मित डोळ्यांच्या औषधामुळे अमेरिकेतील तीन नागरिकांचा मृत्यू झाला. इतकेच नाहीतर अनेकांना अंधत्व आले.
- डिसेंबर २०२२ मध्ये उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने एका भारतीय कंपनीवर आरोप केला होता. नोएडामधील मेरियन बायोटेकने बनवलेल्या कफ सिरपचं सेवन केल्यामुळे १८ बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा मंत्रालयाकडून करण्यात आला होता.
- मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गॅम्बियातल्या ६६ बालकांच्या मृत्यूला जागतिक आरोग्य संघटनेने एका भारतीय कंपनीशी जोडले होते. हरियाणातील एका कंपनीच्या औषधांच्या सेवनाने त्या बालकांना किडनीचा त्रास झाला, असा दावा संघटनेने केला होता.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community