WHOची खुशखबर! कोरोना आता जागतिक महामारी नाही

193
WHOची खुशखबर! कोरोना आता जागतिक महामारी नाही
WHOची खुशखबर! कोरोना आता जागतिक महामारी नाही

जगाला हादरवणारा कोरोना व्हायरस (Corona Virus) आता जागतिक महामारी नसल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) केली आहे. संपूर्ण जगातील नागरिकांना दिलासा देणारी घोषणा शुक्रवारी, ५ मेला जागतिक आरोग्य संघटनेनी केली आहे. डब्ल्यूएचओने ही महत्त्वाची घोषणा करत एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे. डब्ल्यूएचओने सांगितले की, ‘याचा अर्थ कोरोना संपला असे नाही.’

डब्ल्यूएचओ नेमके काय म्हणाले?

डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. ट्रेड्रोस यांनी कोरोना आणि जागतिक आरोग्य मुद्द्यावर एक माध्यमांसोबत बोलत असताना कोरोना जागतिक महामारी नसल्याची घोषणा केली. तसेच ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात, कोरोनामुळे दर तीन मिनिटाला एक मृत्यू झाला आहे. जगभरात हजारो लोक अजूनही आयसीयूमध्ये कोरोनाशी झुंज देत आहेत.

डब्ल्यूएचओ महासंचालकांच्या माहितीनुसार, चीनमध्ये उद्रेक झाल्यापासून तीन वर्षांत कोरोनाने आपले जग बदलले आहे. डब्ल्यूएचओला सुमारे ७ दशलक्ष मृत्यूची नोंद झाली आहे. परंतु आम्हाला माहित आहे की ही संख्या किमान २० दशलक्षांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

डिसेंबर २०१९मध्ये कोरोनाची पहिली केस चीनमध्ये आढळून आली होती. हळूहळू हा व्हायरस जगभरातील इतर देशांमध्ये वेगाने पसरू लागले. त्यानंतर डब्ल्यूएचओने ३० जानेवारी २०२० रोजी आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली. मग ११ मार्च २०२०ला कोरोना व्हायरसला जागतिक महामारी म्हणून घोषित केले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.