जगभरात मंकीपॉक्स व्हायरसच्या रूग्णांमध्ये घट झाली आहे. दरम्यान, WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटना या व्हायरसचे नाव बदलण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या दबावाखाली जागतिक आरोग्य संघटना (WHO) मंकीपॉक्स आजाराचे नाव बदलून एमपॉक्स ठेवणार आहे. एका अमेरिकन वृत्तपत्राच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. मंकीपॉक्स व्हायरसची भीती संपवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे.
(हेही वाचा- MHADA Lottery: कोकण म्हाडाच्या 4 हजारांहून अधिक घरांसाठी ‘या’ महिन्यात निघणार सोडत!)
बिडेन प्रशासनाच्या अधिका-यांच्या वाढत्या दबावामुळे WHO हा निर्णय घेत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला खाजगीरित्या डब्ल्यूएचओकडून नाव बदलून घेण्यास सांगितले. व्हायरसचे नाव बदलण्यासाठी अमेरिकन प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी त्याची घोषणा होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.
जगभरात जरी मंकीपॉक्सच्या रूग्णांत घट झाली असली तरी मे महिन्याच्या सुरूवातीला अमेरिका आणि युरोपमध्ये या व्हायरसची रूग्ण मोठ्याप्रमाणात वाढत होती. मंकीपॉक्सला अमेरिकेतही जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती. अमेरिकेत या व्हायरसची ३० हजारांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. हा व्हायरस आफ्रिकेतून पसरला होता. एंडेमिक भागतही मंकीपॉक्सच्या हजारो रूग्णांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ होती. या व्हायरसची प्रकरणे भारतातही नोंदवली गेली होती. मात्र मंकीपॉक्स देशात पसरला नाही. भारतात मंकीपॉक्सची २० पेक्षा कमी प्रकरणे समोर आली होती.
Join Our WhatsApp Community