भारतीय समाज आणि भारतीय वंशाचे लोक जे परदेशात राहतात, त्यांनी नेहमीच त्या त्या देशाला अभिमान वाटेल असं कार्य केलेलं आहे. हिंदू समाज जिथे राहतो, त्या भूमीशी एकनिष्ठ राहून आपले कर्तव्य बजावत असतो. सध्या अनेक भारतीय वंशाचे लोक चर्चेत आहेत, ज्यांनी नाव कमावलं आहे. आता निमरत रंधावा यांची जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्याला माहितीच आहे की २०२४ मध्ये निमरत रंधावा ह्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत.
निमरत रंधावा ह्या निक्की हेली या नावाने ओळखल्या जातात. निक्की हेली साउथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर होत्या. निक्की हेली यांचे पालक भारतातून अमेरिकेत गेले होते आणि निक्की अमेरिकेतच वाढल्या. निक्की हेली म्हणजेच निमरत रंधावा यांचा जन्म पंजाबी कुटुंबात झाला. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती असताना त्या संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत देखील होत्या. तिचे पालक म्हणजेच वडिल सरदार अजित सिंह रंधावा आणि आई राज कौर रंधावा पंजाबच्या अमृतसरमध्ये राहत होत्या. त्यांचं खरं नाव निमरत निक्की रंधावा असं होतं. त्यानंतर त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. आणि मायकल हेली नावाच्या माणसासोबत विवाह केला. विशेष म्हणजे त्यांचं लग्न शिख आणि ख्रिस्ती अशा दोन्ही पद्धतीने झालं. १९९६ मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर त्या निक्की हेली नावावे ओळखल्या जाऊ लागल्या.
( हेही वाचा :यश म्हणजे काय असतं? MBA ChaiWala ने घेतली ९० लाखांची कार )
२०१८ मध्ये त्यांचे ट्रम्पसोबत मतभेद झाले आणि त्यांनी राजदूताच्या पदाचा राजीनामा दिला. निक्की हेली बर्याचदा भारताला भेट देतात आणि महत्वाचं म्हणजे ते त्यांच्या घराला भेटही देतात. त्या विचाराने पुरोगामी मानल्या जातात. वंशवाद आणि लिंगभेदाच्या विरोधात त्या लढा देतात. २०१० मध्ये अल्पसंख्याक समुदायातून त्या पहिल्यांदा गव्हर्नर झाल्या. त्या केवळ ३७ वर्षांच्या म्हणजेच सर्वात तरुण गव्हर्नर झाल्या. राजकीय आघाडीवर पराक्रम गाजवणार्या निक्की हेली यांना दोन गोंडस मुलं अहएत. मुलाचं नाव नलिन असून मुलीचं नाव रेना आहे.
Join Our WhatsApp Community