ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या प्रचार कमिटीमध्ये होता १९ वर्षीय भारतीय मुलगा; हा प्रज्वल पांडे आहे तरी कोण?

153

ब्रिटनमध्ये आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान झाले आहेत. परंतु आता ऋषी सुनक यांच्या विजयाच्या मागे एका भारतीय तरुणाचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. हा तरूण बिहारचा असून या तरूणाचे नाव प्रज्वल पांडे (prajwal pandey)  आहे.

( हेही वाचा : आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटींची तरतूद)

ऋषी सुनक यांच्या कोअर कमिटीमध्ये जबाबदारी 

प्रज्वल हा फक्त १९ वर्षांचा असून तो ऋषी सुनक यांच्या कोअर कॅम्पेन कमिटीचा स्टार प्रचारक होता. ऋषी सुनक यांच्या प्रसिद्धीपासून, सर्व सोशल मिडियापासून इतर प्लॅटफॉर्मची जबाबदारीही प्रज्वल याने घेतली होती. प्रज्वला हा बिहारमधील जामापूर येथील आहे. ऋषी सुनक आणि त्याच्यात कौटुंबिक संबंध आहेत. प्रज्वल हा ब्रिटनच्या प्रतिष्ठित किंग एडवर्ड सिक्स ग्रामर स्कूल, चेम्सफोर्डमध्ये शिकत आहे. वयाच्या १६ वर्षी त्याने ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टिमध्ये प्रवेश केला. ब्रिटनमधील बोरिस जॉन्सन सरकारच्या पतनादरम्यान प्रज्वल सुनक यांच्या गटात सामील झाला.

मूळ गावच्या लोकांची अनोखी इच्छा 

पंतप्रधानपदाच्या निवडणुकीसाठी जेव्हा ऑगस्ट २०२२ मध्ये ऋषी सुनक यांनी प्रचार सुरू केला तेव्हा प्रज्वलला कोअर टीमचा भाग बनवण्यात आले. त्याने प्रचार व्यवस्थापनात, निवडणूत रणनीती, सोशल मिडीया प्रचारात सुद्धा खूप मेहनत घेतली, परंतु सुनक पहिल्यावेळी पंतप्रधान होऊ शकले नाहीत. त्यानंतर दोन महिन्यात अशी परिस्थिती निर्माण झाली की, लीज ट्रस्ट यांना राजीनामा द्यावा लागला आणि पुन्हा एकदा सुनक यांच्याकडे पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली आणि यावेळी ते पंतप्रधान झाले. ( Rishi Sunak Prime Minister of the United Kingdom)

प्रज्वलचे वडील राजेश पांडे हे यूकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत तर त्याची आई मनीषा पांडे यूकेमध्ये शिक्षिका आहे. प्रज्वल त्याचे मूळ गाव जामापूर येथे येऊन जाऊन असतो. त्याने पुढे जाऊन ब्रिटनचे पंतप्रधान व्हावे अशी इच्छा त्याच्या मूळ गावच्या लोकांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.