Monkeypox Virus: मंकीपॉक्सविरुद्ध ‘WHO’ ने सुचविलेले हे ५ उपाय

कोरोना महामारीचा कहर कुठे थांबतो न थांबतो जगात मंकीपॉक्सचा धोका वाढल्याचे समोर येत आहे. २७ देशांमध्ये ७८० जणांना या आजाराची लागण झाल्याचे निदान चाचण्यांमधून उघड झाले आहे. त्यामुळे मंकीपॉक्सचा मानवाकडून मानवाला होणारा संसर्ग थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पाच प्रतिबंधक उपाय सुचविले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या ५ प्रदेशांसह २७ देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार झाल्याचे सांगितले जात आहे. १३ मे ते २ जून यादरम्यान प्रयोगशाळांमध्ये तपासलेले ७८० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे हा आजार रोखण्यासाठी ‘डब्लूएचओ’ने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – MHADA Lottery: पुण्यात 5 हजार घरांची लॉटरी, ‘या’ तारखेपर्यंत भरा अर्ज)

‘डब्लूएचओ’चे पाच प्रमुख उपाय

  • मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार होत असल्याने समाजात मंकीपॉक्स बद्दल जनजागृती करणे
  • मानवाकडून मानवाला होणारा संसर्ग थांबविणे.
  • मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णांचे विलगीकरण करणे आणि संसर्ग रोखण्यासाठीच्या उपायांवर त्यांचे विचार जाणून घेणे.
  • काळजीवाहू कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे. मंकीपॉक्सचे नमुने घेणारे, बाधित रुग्णांची देखभाल करणाऱ्यांना योग्य माहिती असल्याची, त्यांना योग्य प्रकारची वैयक्तिक संरक्षण उपकरणे देणे
  • प्रतिबंधक उपाय व लसीकरण उपलब्ध असले तरी ज्यांना सर्वांत जास्त धोका असलेल्यांसाठी त्याचा योग्य वापर करणे

मंकीपॉक्सचा प्रसार रोखणे अत्यंत आवश्यक

दरम्यान,  संशोधन व विकासाच्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी ‘डब्लूएचओ’ जागतिक पातळीवर मोठ्या बैठकीचे आयोजन करणार आहे. विषाणूजन्यविज्ञानापासून, निदान, उपचारात्मक आणि लसीकरण अशा सर्व बाबींवर संशोधन करण्यात येईल. सध्या असलेली परिस्थिती गंभीर असून मंकीपॉक्सचा संसर्ग लवकर ओळखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य साधनांचा वापर करता येणं शक्य आहे. जेथे हा आजार नवा आहे, अशा देशांमध्ये त्याचा प्रसार रोखणे अत्यंत आवश्यक असल्याचे ‘डब्लूएचओ’च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here