मुस्लिम धर्मगुरू सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती उर्फ सुफी बाबा हत्या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे, एक जण सुफी बाबाचा वाहन चालक असून दुसरा सहकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मूळचा अफगाण देशातील नागरिक असलेला सुफी ख्वाजा हा दीड वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे आला होता, दीड वर्षात त्याने नाशिक जिल्ह्यात कोट्यवधीची संपत्ती जमवली होती, मात्र ही सर्व संपत्ती त्यांच्या नावावर होत नसल्यामुळे त्याने इतरांच्या नावावर केली आहे. संपत्तीच्या वादातून सुफी बाबा याच्यावर चालक आणि सहकार्याने गोळ्या झाडून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुफीबाबाच्या हत्येमुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे.
आरोपींपैकी एक सुफीबाबाचा चालक
नाशिक जिल्ह्यातील येवला एमआयडीसी परिसरात एका जमिनीची पूजा करण्यासाठी जायचे असल्याचे सांगून मंगळवारी सायंकाळी सुफीबाबा याला एमआयडीसी परिसरात आणण्यात आले होते. त्या ठिकाणी सुफी ख्याजा उर्फ सुफी बाबा याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, हत्येनंतर मारेकऱ्यानी सुफीबाबा याच्या मोटारीसह तेथून पळ काढला होता. या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला असून येवला पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करीत दोन संशयितांना बुधवारी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेले दोघांपैकी एक जण सुफी बाबा याच्या वाहनावरील चालक असून दुसरा त्याचा सहकारी असल्याची माहिती पाटील यांनी दिली. प्राथमिक चौकशीवरून ही हत्या संपत्तीच्या वादातून झाली असल्याची दाट शक्यता आहे, मात्र आम्हीच सर्वांगाने तपास करीत असल्याचे पोलीस अधिक्षक पाटील यांनी सांगितले.
(हेही वाचा पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा)
सुफीबाबाला अफगाणमधून हाकलेले होते
सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती उर्फ सुफी बाबा हा मुस्लिम धर्मगुरू होता, मूळचा अफगाण देशाचा नागरिक असून दीड वर्षांपूर्वी त्याला अफगाणमधून हाकलण्यात आले होते व तो भारतात आश्रयाला आला होता. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे राहत होता, मुस्लिम धर्मगुरू असलेला सुफी ख्वाजा याला येवल्यात सुफीबाबा म्हणून ओळखले जात आहे. पूजा पाठ करणे, मुस्लिम धर्मियांना प्रवचन देणे यासारखे कामे सुफीबाबा करीत होता, त्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असून त्यातून त्याला मोठ्या देणग्या मिळत होत्या, रिफ्युजी आल्यामुळे त्याचे कुठल्याही बँकेत खाते नसल्यामुळे तो दुसयांच्या बँक खात्यावर देणग्या मागवत होता, त्या पैशातून त्याने केवळ दीड वर्षात नाशिक जिल्ह्यात अफाट संपत्ती तयार केली होती, मात्र त्या जमिनी, वाहने त्याने दुसऱ्याच्या नावावर खरेदी केली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांच्या नावावर सुफीबाबा याने जमिनी घेतल्या होत्या, तसेच त्यांच्या बँक खात्यावर मोठा देणग्या मागवल्या होत्या. हत्येमागे संपत्ती हे एक कारण असू शकते अशी माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community