BUDGET 2022 : बजेट म्हणजे काय? बजेट कोण तयार करतं? वाचा सविस्तर

126

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प म्हणजेच बजेट म्हणजे काय? हा बजेट कसा तयार केला जातो? कोण तयार करतं याविषयी आपण जाणून घेणार आहोत. राज्यात मागील वर्षांपासून कोरोनाने हाहाकार घातला आहे. कोरोना संकटामुळे राज्याची अर्थव्यवस्थाही ढासळली आहे. त्यामुळे यंदाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची आशा आहे. व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, रेल्वे यासारख्या क्षेत्रांच्या नजरा अर्थव्यवस्थेकडे लागल्या आहेत.

दरवर्षी तज्ज्ञ मंडळींच्या विचारमंथनातून संशोधनाचा आधार घेत अर्थसंकल्प तयार होत असतो. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निर्मिती प्रक्रियेत कोणाच्या महत्वपूर्ण भूमिका असतात जाणून घ्या…

बजेट म्हणजे नेमकं काय…

राज्यातील विकासकामांवर खर्च करण्यासाठी तसेच वर्षभरातील खर्चाचे आणि पैसा जमा करण्याचे आर्थिक नियोजन मांडणे म्हणजेच बजेट आहे. राज्यातील विकासकामांवर केला जाणारा खर्च, पेट्रोल-डिझेलच्या दरांवरील कर, व्याज, तसेच राज्याच्या तिजोरीत येणारा पैसा यावर नियोजन केले जाते. राज्यातील तिजोरीतला पैसा कुठे आणि कसा खर्च केला जणार हे सांगणारे नियोजन म्हणजे बजेट.

1. डॉ. टी.व्ही.सोमनाथन

अर्थसंकल्प टीमचा प्रमुख चेहरा म्हणजे डॉ. टी व्ही सोमनाथन. ते अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आहेत. सोमनाथन यांनी कोलकाता विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी पूर्ण केली असून अर्थसंकल्पाची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. यंदा अर्थसंकल्पातील खर्चाचं गणित सांभाळण्याचं आवाहन त्यांच्यासमोर असणार आहे.

2. देबाशीष पांडा

देबाशीष पांडा अर्थ मंत्रालयात सेवा विभागात सचिव पदावर कार्यरत असून उत्तर प्रदेश कॅडरचे 1987 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अर्थव्यवस्थेतील सर्व छोट्या-मोठ्या घोषणांची जबाबदारी पांडा यांच्याकडे आहे. अर्थमंत्रालय व रिझर्व्ह बँक यांच्या कारभाराबाबत समन्वय साधण्याची महत्वपूर्ण जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

3. तरुण बजाज

अर्थमंत्रालयात पदभार स्विकारण्यापूर्वी बजाज पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. तरुण बजाज अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागाचे सचिव असून ते हरियाणा केडरचे 1988 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अर्थमंत्रालयात बजाज यांनी आतापर्यंत अर्थसहाय्य पॅकेजवर काम केले आहे. कोरोना काळात सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदत निधी संरचना ठरविण्यात बजाज यांची महत्वाची भूमिका आहे.

4. अजय सेठ

अर्थमंत्रालयाचे सचिव अजय सेठ यांच्यावर सर्वांचा नजरा असतात. निर्मला सीतारमण यांची सर्व अर्थसंकल्पीय भाषणांचा मसुदा निर्मितीचे प्रभारी अजय सेठ आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे लिहीण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते.

5. तुहिन कांत पांडे

गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांच्या नावाचा देखील अर्थसंकल्प तयार करण्यात समावेश आहे. निर्गृंतवणुकीचे महत्वाचे निर्णय पांडे यांच्या अखत्यारित येतात. त्यामुळे यंदा पांडे यांच्यासमोर निर्गृंतवणुकीच्या अनेक योजना तसेच एलआयसी आयपीओ प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.