RRR चित्रपटात राम चरणने ज्यांची भूमिका साकारली, ते Alluri Sitarama Raju कोण होते?

117
RRR चित्रपटात राम चरणने ज्यांची भूमिका साकारली, ते Alluri Sitarama Raju कोण होते?
RRR चित्रपटात राम चरणने ज्यांची भूमिका साकारली, ते Alluri Sitarama Raju कोण होते?

RRR हा चित्रपट पुष्कळ चालला. त्यातल्या नातू नातू गाण्याला ऑस्कर देखील मिळाला. त्यामध्ये राम चरण या अभिनेत्याने अल्लुरी सिताराम राजू (Alluri Sitarama Raju) या पात्रावर आधारित एक भूमिका केली होती. हा चित्रपट पूर्णपणे ऐतिहासिक नसला तरी त्यात ऐतिहासिक संदर्भ मात्र घेण्यात आले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे अल्लुरी सीताराम राजू  (Alluri Sitarama Raju) कोण होते? चला तर आज आम्ही तुम्हाला या महान क्रांतिकाराबद्दल सांगणार आहोत.

अल्लुरी सीताराम राजू (Alluri Sitarama Raju) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांनी भारतात ब्रिटीश राजवटीविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले होते. ४ जुलै १८८२ मध्ये आंध्र प्रदेशात (सध्याच्या) त्यांचा जन्म झाला होता. मद्रास वन कायद्याविरोधात प्रतिकार करण्यासाठी त्यांनी संघटन उभे केले होते. या कायद्यांतर्गत वनवासींच्या वन अधिवासात मुक्त संचार करण्यावर प्रतिबंध केला होता आणि त्यांना ‘पोडू’ नावाची त्यांची पारंपरिक शेती करण्यापासून रोखण्यात आले होते. हा सरळसरळ वनवासींवर अन्याय होता. (Alluri Sitarama Raju)

(हेही वाचा- Pune Zika Virus : झिकाच्या रुग्णांत वाढ, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यासाठी जारी केली नियमावली!)

या कायद्याच्या विरोधात मोठी प्रतिकार चळवळ उभी राहिली, ज्यामध्ये अल्लुरी सितारामा राजू यांनी नेतृत्व केले होते. ही चळवळ १९२० -१९२२ दरम्यान झाली. पुढे या चळवळीला रंपा बंड असे नाव देण्यात आले, हे बंड १९२२-१९२४ दएअम्यान झाले. वनवासी आणि इतर जनजातींना एकत्रित करुन त्यांचे सैन्यात रुपांतरण करण्यात आले. त्यांनी आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये ब्रिटिश सैन्याविरुद्ध गनिमी मोहिमा चालवला. स्थानिक लोकांनी अल्लुरी सीताराम राजू (Alluri Sitarama Raju) यांना “मन्याम वीरुडू” म्हणजेच “जंगलाचा राजा” ही पदवी दिली. (Alluri Sitarama Raju)

बंडासाठी शस्त्रे मिळवण्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यांवर छापे टाकले. प्रत्येक छाप्यानंतर, ते स्टेशनवर त्यांच्या स्वाक्षरीत एक चिठ्ठी ठेवत होते, ज्यामध्ये त्यांनी केलेल्या लुटीच्या तपशिलांची माहिती पोलिसांना दिली होती, ज्यात त्यांनी मिळवलेल्या शस्त्रास्त्रांचा तपशीलही होता. त्याचबरोबर ते त्यांना रोखण्यासाठी इंग्रजांना आव्हान देत होते. त्यामुळे ब्रिटिश शासन चवताळून उठले होते. (Alluri Sitarama Raju)

(हेही वाचा- T20 Champions Return Home : भारतीय संघाच्या सत्कार समारंभाचं रोहितने चाहत्यांना असं दिलं निमंत्रण)

ब्रिटीश अधिकाऱ्यांनी अल्लुरी सीताराम राजू (Alluri Sitarama Raju) यांना शोधण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. यामध्ये सरकारचे सुमारे ४० लाख रुपये खर्च झाले. अखेर १९२४ मध्ये ते चिंतापल्ले जंगलातील कोय्युरू गावात अडकले. तिथे त्यांना पकडण्यात आले. त्यांना एका झाडाला बांधले गेले आणि गोळीबार पथकाने त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. अल्लुरी हुतात्मा झाले. आंध्र प्रदेशातील कृष्णादेवीपेटा गावात त्यांची समाधी बांधण्यात आली आहे.  (Alluri Sitarama Raju)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.