Jhalkari Bai : राणी लक्ष्मीबाईची सहकारी झलकारीबाई कोण होती ?

राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत झलकारीबाई यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. १८५७ च्या क्रांती युद्धात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत लढली होती शूरवीर झलकारीबाई.

471
Jhalkari Bai : राणी लक्ष्मीबाईची सहकारी झलकारीबाई कोण होती ?
Jhalkari Bai : राणी लक्ष्मीबाईची सहकारी झलकारीबाई कोण होती ?

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास अनेक लोकांना माहिती आहे. मात्र झलकारीबाईचा (Jhalkari Bai) इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नाही. राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत झलकारीबाई यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. १८५७ च्या क्रांती युद्धात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत लढली होती शूरवीर झलकारीबाई.

२७ व्या वर्षी प्राणांची आहुती

झलकारी बाई झाशीची राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai of Jhansi) यांच्या सैन्यातील महिला शाखा दुर्गा दलाची सेनापती होती. महत्त्वाचे म्हणजे ती राणी लक्ष्मीबाईसारखीच दिसायची, म्हणून शत्रूची दिशाभूल करण्यासाठी ती राणीच्या वेशात लढत असे. राणीच्या वेशात लढत असतानाच तिला इंग्रजांनी राणी समजून पकडले आणि राणीला किल्ल्यावरून पळून जाण्याची संधी मिळाली. २७ व्या वर्षी तिने देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. (Jhalkari Bai)

(हेही वाचा – MNS : दुकानांवर मराठी पाट्या; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उरले ४ दिवस; मनसेने करून दिली आठवण)

युद्धकला लहानपणीच आत्मसात

२२ नोव्हेंबर १८३० रोजी झलकारीबाईचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. ती लहान असतानाच तिची आई वारली. वडील सरोदर सिंह यांनी तिचे पालपोषण केले आणि मुलगा समजून वाढवले. युद्धकला तिने लहानपणीच आत्मसात केली होती. लहानपणापासूनच झलकारीबाई ही धाडसी, निर्भीड, निडर होती. राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील सेनापती पूरण कोरी यांच्याशी तिचे लग्न झाले. (Jhalkari Bai)

दुर्गा सैन्याच्या महिला विभागाच्या प्रमुख

गौरीपूजनाच्या निमित्ताने झाशीच्या सर्व स्त्रिया राणी लक्ष्मीबाईच्या वाड्यात त्यांचा सन्मान करण्यासाठी जात. झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि झलकारीबाई यांची तेव्हाच पहिली भेट झाली. राणी लक्ष्मीबाईंनी झलकारी बाईंच्या शौर्याचे किस्से ऐकले होते. लक्ष्मीबाईंनी तिला दुर्गा सैन्याच्या महिला विभागाचे प्रमुख केले.

(हेही वाचा – Suitcase Murder Case : चारित्र्याच्या संशयावरून करण्यात आली हत्या)

‘आता शरण नव्हे रण’

पुढे १८५७ च्या युद्धात तिने खूप मोठे योगदान दिले. झलकारीबाईचे पती पूरण सिंह यांचे किल्ल्याचे रक्षण करताना हुतात्मा झाले. ‘आता शरण नव्हे रण’ असे म्हणत झलकारीबाई युद्धाला सज्ज झाली. झलकारीने लक्ष्मीबाईंप्रमाणे वेषभूषा करून झाशीच्या सैन्याची कमान घेतली. त्यानंतर ती किल्ल्यातून बाहेर आली आणि ब्रिटीश जनरल ह्यूग रोजच्या छावणीत शिरली.

ब्रिटिश छावणीत पोहोचल्यावर ती ओरडली की तिला जनरल ह्यू्ग रोजला भेटायचे आहे. जनरलला वाटले की, आपण राणीला पकडले. जनरलने विचारले की, आता तुझ्यासोबत काय करु ? तर ती म्हणाली, मला फाशी द्या. जनरल झलकारीच्या शौर्याने प्रभावित झाला आणि ही राणी नाही हे कळून चुकल्यामुळे त्याने तिला सोडले. मात्र ती पुन्हा लढली आणि हुतात्मा झाली. अशी आहे झलकारीबाईची कहाणी ! (Jhalkari Bai)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.