त्यागराज (Tyagaraja) हे अध्यात्मिक कवी आणि कर्नाटकी महान संगीतकार होते. ते एक अष्टपैलू प्रतिभासंपन्न कलाकार. त्यांनी भगवान रामाच्या स्तुतीसाठी शेकडो भक्तिगीते रचली आणि त्यांचे सर्वोत्कृष्ट गीत ’पंचरत्न कृती’ हे आजही धार्मिक कार्यक्रमांमध्ये गायले जाते. त्यागराज यांचा जन्म ४ मे १७६७ रोजी तंजावर जिल्ह्यातील तिरुवरूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सीतम्मा आणि वडिलांचे नाव रामब्रह्म असे होते. (Tyagaraja)
ते संस्कृत ज्योतिष आणि मातृभाषा तेलुगूचे पंडित होते. अध्यात्माच्या बाबतीतही ते अधिकारी पुरुष असल्याचे मानले जाते. त्यांच्यासाठी संगीत हा भगवंताला भेटण्याचा मार्ग होता. म्हणूनच त्यांच्या भक्तीगीतातून आजही ईश्वराबद्दलची ओढ निर्माण होते. त्यांना संगीताची आवड लहानपणापासूनच होती. ते लहान वयात वेंकटरामनिया यांचे शिष्य झाले आणि त्यांनी किशोरवयातच ‘नमो नमो राघवा’ हे पहिले गाणे तयार केले. (Tyagaraja)
(हेही वाचा – अर्ज भरून प्रचाराला सुरुवात ; Adv Ujjwal Nikam यांचे विरोधकांना थेट आव्हान)
‘ही’ त्यागराज यांची सर्वोत्कृष्ट रचना
दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीताच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या रचना आजही खूप लोकप्रिय आहेत. आजही त्यांच्या सन्मानार्थ अनेक कार्यकम आयोजित केले जातात आणि त्यांच्या रचनांचे गायन होते. त्यागराज (Tyagaraja) यांनी मुत्तुस्वामी दीक्षित आणि श्यामशास्त्री यांच्यासमवेत कर्नाटकी संगीताला नवी दिशा दिली. म्हणूनच या तिघांना त्रिमूर्ती म्हटले जाते. (Tyagaraja)
पंचरत्न कृती ही त्यांची सर्वोत्कृष्ट रचना मानली जाते. त्यांनी शेकडो गाणी लिहिली आणि गायली. त्याचबरोबर त्यांनी उत्सव संप्रदाय कीर्तनम् आणि दिव्यनाम कीर्तनम् देखील रचले. त्यांनी संस्कृतमध्येही गाणी रचली असली तरी त्यांची बहुतांश गाणी तेलुगूमध्ये आहेत. त्यागराज (Tyagaraja) यांच्या रचना सर्वोत्कृष्ट आहेत आणि त्यामध्ये अनावश्यक असे काही नाही, असे म्हटले जाते. त्यांना दोनच गोष्टींचा ध्यास होता, संगीत आणि भक्ती! त्यांच्या आयुष्यातील एकही क्षण असा गेला नाही, जेव्हा त्यांनी रामानाम गायले नाही. त्यांनी याच भक्तीभावात ६ जानेवारी १८४७ रोजी समाधी घेतली आणि ते प्रभू रामांत विलीन झाले. (Tyagaraja)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community