Walt Disney : कोण होते वॉल्ट डिस्ने ?

Walt Disney : वॉल्टर एलियास डिस्ने यांनी कॅलिफोर्निया राज्यातील अनाहीम येथे १६० एकर भूमीवर ’डिस्ने लॅंड’ (Disney Land) ही नगरी उभारली आणि लहान मुलांना ही भूमी जणू भेट म्हणूनच दिली.

349
Walt Disney : कोण होते वॉल्ट डिस्ने?
Walt Disney : कोण होते वॉल्ट डिस्ने?

वॉल्टर एलियास डिस्ने (Walt Disney) यांचा जन्म १९०१ मध्ये शिकागो (Chicago) येथील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. लहानपणी ते वडिलांना शेतात मदत करायचे. त्यांना चित्रे काढायला खूप आवडायची. त्यांनी आयवर्क्स सोबत ’आयवर्क्स डिस्ने’ नावाने कलात्मक वस्तू विकणारी कंपनी सुरू केली. पण ही कंपनी चालली नाही. कारण आयवर्क्स या नावावरुन ती चष्मा बनवणारी कंपनी आहे असा लोकांचा समज झाला. एका महिन्यातच त्यांनी ही कंपनी बंद केली.

(हेही वाचा – PM Narendra Modi : सिंधुदुर्ग हे छत्रपती शिवरायांच्या सामर्थ्याचे प्रतीक; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार)

मिसुरी येथील मार्सेलीन (Marceline) येथे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. मात्र त्यांना चित्रे काढण्याचा छंद होता. मूळ शिक्षणाकडे त्यांचा कल नव्हता. १९१७ त्यांनी शिकागो येथे छायाचित्रण कलेचे प्रशिक्षण घेतले. मग पुढे १९१९ मध्ये कॅन्सासा येथे एका कमर्शियल आर्ट स्टुडिओमध्ये नोकरी मिळवली. नंतर त्यांनी आयवर्क्ससोबतच दोन मिनिटांच्या जाहिराती बनवायला सुरुवात केल्या.

पूर्वी तर ते वेळ असला की लोकांची चित्रे काढून आपली पॉकेटमनी मिळवायचे. यावर्क्स यांच्यासोबत त्यांनी ’ऑस्वोल द रेंबिट’ (Oswol the Rembit) या पहिल्या कार्टुनची निर्मिती केली. पण त्यांना एक असे कार्टुन हवे होते, जो मुलांचा दोस्त होईल. अखेर १९२७ मध्ये त्यांनी ’मिकी माऊस’ (Mickey Mouse) हे कार्टुन तयार केले. त्यानंतर डोनाल्ड डक (Donald Duck), गुफी (Goofy), ही पात्रेही तयार झाली आणि या पात्रांनी लहान मुलांचे भावविश्व व्यापून टाकले.

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; 13 जणांचा मृत्यू)

१९५५ साली त्यांनी कॅलिफोर्निया राज्यातील अनाहीम येथे १६० एकर भूमीवर ’डिस्ने लॅंड’ (Disney Land) ही नगरी उभारली आणि लहान मुलांना त्यांनी ही भूमी जणू भेट म्हणूनच दिली. हा एक कार्टुनचा स्वर्गच आहे. अशा महान कलाकाराचा आज जन्मदिवस. (Walt Disney)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.