भारतीय मुसलमानांना सौदीत ‘नो एन्ट्री’!

मुसलमानांसाठी पवित्र समजले जाणारे मक्का येथील सौदी सरकार कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या म्हणून सांगत असताना भारतीय मुसलमान मात्र त्याला इस्लामविरोधी असल्याचे सांगत विरोध करत आहेत. अशा मुसलमानांसाठी सौदी सरकारने हज यात्राच नाकारली आहे.    

जगभरातील मुसलमान पवित्र स्थान मानत असलेल्या मक्का मदीना हे ठिकाण ज्या सौदी अरेबिया येथे आहे, त्यांनी सौदी बाहेरील मुसलमानांना प्रवेश बंदी केली आहे. तसा फतवाच सौदी सरकारने काढला आहे. ‘यंदा जर तुम्हाला हज यात्रेला यायचे असेल, तर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावीच लागेल, ती लस घेतली म्हणून तसा पुरावाही दाखवावा लागेल, तरच प्रवेश दिला जाईल’, असे सौदी सरकराने जगभरातील मुसलमानांना सांगितले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस म्हणजे ‘हराम’, ‘इस्लामविरोधी’ असे म्हणत लसीकरणाला विरोध करणाऱ्या भारतीय मुसलमानांसाठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मुसलमानांसाठी पवित्र समजले जाणारे मक्का येथील सौदी सरकार कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या म्हणून सांगत असताना भारतीय मुसलमान मात्र त्याला इस्लामविरोधी असल्याचे सांगत विरोध करत आहेत, हा विरोधाभास यानिमित्ताने उघडकीस आला आहे.

काय म्हटले आहे सौदी सरकारने? 

सौदी अरेबियाच्या आरोग्य विभागाचे मंत्री तौफिक अल रबिया यांनी मंगळवार, २ मार्च रोजी बोलतांना सांगितले कि, यंदाच्या हज यात्रेसाठी ज्या मुसलमानांना यायचे असेल, त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे अनिवार्य असणार आहे. लस घेतली आहे, तसा पुरावा दाखवावा लागणार आहे. १७ जुलैपासून हज यात्रेला प्रारंभ होणार आहे. मंत्रालयाने अद्याप यासाठी सौदी बाहेरील मुसलमानांना प्रवेश द्यायचा का, यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, मात्र त्यापूर्वी सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्र्याने देशभरातील मुसलमानांना उद्देशून कोरोना लसीच्या संबंधी काही सूचना केल्या. गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे हज यात्रेला केवळ १ हजार जणांना प्रवेश देण्यात आला होता. आजवर सौदी अरेबियात एकूण ३ लाख ७७ हजार ७०० कोरोना रुग्ण सापडले असून ६,५०० जणांचा मृत्यू झाला आहे.

(हेही वाचा : कोविड सेंटरमध्ये रुग्ण महिलेसोबत डॉक्टरने केला घृणास्पद प्रकार… विरोधक सरकारला विचारणार जाब!)

सौदी म्हणते कोरोना लस घ्या, भारतीय मुसलमान म्हणतात नको!  

मक्का म्हणजे मुसलमानांसाठी पवित्र स्थान, श्रद्धा स्थान. त्याच मक्का मदीना येथील सौदी सरकार हे कोरोना लसीबाबत आधुनिक विचार करत आहे. जगभरातील मुसलमानांनी लस घ्यावी, असे आवाहन मुसलमानांना करत आहे. तर दुसरीकडे भारतातील मुसलमान याला धार्मिक रंग देत विरोध करत आहेत. लस न घेण्याचे आवाहन करत आहेत. ज्यामुळे उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार संगीत सिंग सोम यांनी याला विरोध करत ‘देशातील ज्या मुसलमानांना कोरोना लसीचा विरोध करायचा असेल त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावे’, असे म्हटले.

का आहे मुसलमानांचा विरोध? 

जेव्हापासून जगभरात कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्मितीसाठी प्रयत्न सुरु झाले. तेव्हा डिसेंबरच्या अखेरीस रुस, ब्रिटन आणि चीन यांच्या लसी बाजारात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील भारतनिर्मित लस लवकरच बाजारात येईल, असे जाहीर केले होते. तेव्हा भारतातील काही ठिकाणी मुसलमानांनी या लसींना विरोध केला होता. विशेष म्हणजे मुंबईतील रझा अकादमीने याला सर्वात आधी विरोध केला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशातील देवबंदी उलेमाचे मौलाना करी इष्क गोरा यांनी याला विरोध केला. ही लस निर्मिती करताना कोणते पदार्थ वापरण्यात आले आहेत, हे जोपर्यंत समोर येत नाही तोवर मुसलमानांनी ही लस घेण्याविषयी निर्णय घेऊ नये, असे आवाहन केले होते.

रझा अकादमीचे आक्षेप! 

  • कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवण्यासाठी डुकराच्या मांसाचा वापर करावा लागत आहे, जो मुसलमानांसाठी ‘हराम’ आहे.
  • त्यामुळे ही लस कोणत्याही विषाणूंवर मारक ठरत नाही, तसेच ही लस मुसलमानांसाठी इस्लामविरोधी आहे.
  • याआधीही पोलिओची लस ही इस्लामविरोधी असल्याचे सांगत मुसलमानांनी त्याला विरोध केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here