विकासकामांच्या प्रस्तावांची माहिती प्रशासन का लपवते? समाजवादी पक्षाचा आयुक्तांना सवाल

106

महानगरपालिका आयुक्त यांची प्रशासक म्हणून कार्यकाळ सुरु झाल्यापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये एक नवीन धोरण सुरु केले आहे. महानगरपालिकामध्ये सुरु असलेल्या विकास कामांबाबत लोकप्रतिनिधीनीकडून विचारण्यात येत असलेली माहिती लोकप्रतिनिधींना दिली जात नाही. त्यामुळे महानगरपालिकेतील मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार लोकांसमोर येईल म्हणून लोकप्रतिनिधीद्वारे विचारण्यात आलेली माहिती देण्यात येत नाही का? की हे ठेकेदारांना तसेच इतर कोणाला आर्थिकदृष्ट्या फायदा पोहचविण्याचे कारण आहे असा सवाल समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते व आमदार रईस शेख यांनी केला आहे.

( हेही वाचा : मुंबईतील शुक्रवारची पाणीकपात रद्द)

माहिती लोकप्रतिनिधींना दिली जात नाही

०७ मार्च २०२२ रोजी मुंबई महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्त हे प्रशासक म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आर्थिक दृष्ट्या तसेच शहरातील नागरिकांच्या हिताबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकारही त्यांना प्राप्त झाले आहेत. महानगरपालिका आयुक्त यांची प्रशासक म्हणून कार्यकाळ सुरु झाल्यापासून महानगरपालिकेमध्ये एक नवीन धोरण सुरु केले आहे. महानगरपालिकामध्ये सुरु असलेल्या विकास कामांबाबत लोकप्रतिनिधीनीकडून विचारण्यात येते असलेली माहिती लोकप्रतिनिधींना दिली जात नाही तसेच त्यांनी दिलेल्या सूचना बाबत कोणत्याही प्रकारे कार्यवाही केली जात नाही,असे रईस शेख यांनी म्हटले आहे.

आपण स्वत: १४ मार्च २०२२ तसेच १२ मे २०२२ रोजी पत्र लिहून महानगरपालिकेमध्ये आर्थिक कारभारातील पारदर्शकताबाबत धोरण निश्चत करण्याबाबत निवेदन देऊन विनंती केली होती तसेच महानगरपालिका चिटणीस कार्यालयाकडेही १० मे २०२२ तसेच २१ मे २०२२ रोजी पत्र देऊन महानगरपालिकेमध्ये विकास कामांबाबत माहिती मागितली होती. परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारांची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींना माहिती न देण्यामागील मुख्य कारण काय आहे, हे एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून समजण्या पलीकडील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

समाजवादी पक्षाचा आयुक्तांना सवाल

मुंबई महानगरपालिकेमध्ये पारदर्शकतेबाबत धोरण नसल्यामुळे सर्वात मोठा भ्रष्ट्राचार होऊ शकतो हे नाकारता येणारा नाही,अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासक नियुक्ती नंतर महानगरपालिकेमध्ये किती प्रस्ताव सादर झालेले आहेत. त्यामधील किती प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. त्याबाबत माजी नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नाही तसेच लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अधिकारी वर्गाकडून करण्यात येणारा कारभार सर्वसामान्य नागरिकांनाही समजत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

जे प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत, त्यामध्ये कोणत्या प्रकारची कामे केली जाणार आहेत हेही समजत नाही. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार लोकांना समोर येईल म्हणून लोकप्रतिनिधीद्वारे विचारण्यात आलेली माहिती त्यांना देण्यात येते नाही हे मुख्य कारण आहे का असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला आहे. जर हे कारण नाही तर ठेकेदारांना तसेच इतर कोणाला आर्थिकदृष्ट्या फायदा पोचविण्याचे मुख्य कारण आहे का असाही सवाल त्यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.