जाणून घ्या, भारतात इलेक्ट्रिक गाड्या पेट का घेताहेत?

156

भारतात मागच्या काही दिवसांत इलेक्ट्रिक स्कूटर पेट घेण्याच्या घटना घडल्या आहेत. देशभरात आतापर्यंत  चार इलेक्ट्रिक गाड्यांनी पेट घेतला आहे. यात दोघांचा जीवही गेला आहे. पर्यावरणाचा विचार करता, सरकार सर्वांना वीजेवर चालणा-या गाड्या वापरण्याचे आवाहन करत आहेत. पण, असे असताना जर या इलेक्ट्रिक गाड्या पेट घेत असतील तर वीजेवर धावणा-या गाड्यांचे भविष्य नेमके काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गाड्या पेट का घेताहेत

देशभरात ज्या इलेक्ट्रिक गाड्यांनी पेट घेतला आहे, त्यात तमिळनाडूमधील तीन घटना आहेत. या तिन्ही घटनांमध्ये या इलेक्ट्रिक गाड्या चार्ज होत असताना पेटल्या आहेत. पण महाराष्ट्रातल्या पुणे येथे पेट घेतलेली स्कूटर एका जागी उभी होती. त्यामुळे जास्त चार्जिंग झाली तरच इलेक्ट्रिक गाड्या पेट घेतात असे नाही. तर मग या वीजेवरच्या गाड्या पेट का घेत आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे.

तर कारवाई होणार

देशातील वीजेवर धावणा-या गाड्या पेट घेण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी ते खूप गंभीर आहे. त्यामुळे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत या सगळ्या घटनांची फाॅरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत आणि जर तपासणीत या गाड्या बनवणा-या कंपन्या दोषी आढळल्या, तर त्या कंपन्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे, नितीन गडकरींनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेने  तपासणी केली असता…

अमेरिकेत जेव्हा वीजेवर धावणा-या गाड्या वापरात आल्या तेव्हा अशा अनेक घटना वारंवार घडत होत्या त्यावेळी तपासणी केली असता असे समोर आले की,

  • या वीजेवर धावणा-या गाड्यांमध्ये लिथिअम आयन बॅटरीचा वापर केला जातो. त्यामुळे ही बॅटरी जास्त तापमानात गरम होऊन पेट घेते.
  • व्हायब्रेशन हे सुद्धा एक मोठे कारण सांगण्यात आले होते. गाडी चालवताना जर बॅटरी जास्त व्हायब्रेट झाली तरीही गाडी पेट घेण्याची शक्यता आहे.
  • तसेच, मॅन्युफॅक्चर करताना जर गाडीत काही त्रूटी राहिल्या तरीही गाडी पेट घेण्याची शक्यता असते.

( हेही वाचा: धक्कादायक! महाराष्ट्र सर्वाधिक कर्जबाजारी, जाणून घ्या तुमच्या डोक्यावर किती आहे कर्ज )

2030 पर्यंत 90 पटीने पसरणार जाळे

भारतात सध्या वीजेवर धावणा-या रजिस्टर्ड  गाड्यांची संख्या 10 लाख 75 हजार 420 आहे. तर या गाड्यांच्या तुलनेत पब्लिक चार्जिंग स्टेशन्स 1 हजार 742 आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 2026 पर्यंत भारतात 4 लाख चार्जिंग स्टेशन्सची गरज भासणार आहे. तसेच, 2030 पर्यंत वीजेवर धावणा-या या गाड्यांचे मार्केट 90 पटीने पसरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.