नेहरूंची चूक इंदिरा गांधींनी सुधारली नसती, तर ‘RAW’ चे काय झाले असते?

भारताची सध्या जगभरात कार्यरत असलेली प्रभावशाली गुप्तचर यंत्रणा रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (R&AW-रॉ)ची स्थापना होण्यामागे भारतीय संरक्षण दलाचे अपयश कारणीभूत आहे. ब्रिटिशकालीन इंटेलिजन्स ब्युरोवर भारताची गुप्तचर यंत्रणा अवलंबून होती, स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश निघून गेले आणि त्यांच्यासोबत प्रशिक्षित मनुष्यबळही गेले. मात्र त्यानंतर २२ वर्षे भारताने या यंत्रणेला सक्षम करण्याचा विशेष प्रयत्नच केला नाही. परिणामी १९६२च्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव झाला. तोवर जवाहरलाल नेहरू यांना देशाचे गुप्तचर खाते मजबूत करावे, असे वाटले नाही. त्यामुळे शेवटी भारताला संपूर्ण समर्पित असावी अशी गुप्तचर यंत्रणा असावी असा विचार समोर आला आणि ‘रॉ’ ची स्थापना झाली. परंतू जर जवाहरलाल नेहरूंची चूक इंदिरा गांधींनी सुधारली नसती, तर ‘RAW’ अस्तित्वातच आली नसती.

भारत-चीन युद्धात पराभवानंतर मांडली संकल्पना  

‘रॉ’च्या स्थापनेपूर्वी परदेशातील गुप्त माहिती संकलन करण्याची जबाबदारी इंटेलिजन्स ब्युरो (IB) ची होती, जी ब्रिटिश राजवटीने तयार केली होती. 1933 मध्ये जागतिक पातळीवर अत्यंत अस्थिर वातावरण निर्माण झाले आणि शेवटी दुसरे महायुद्ध झाले. त्यानंतर भारतातील गुप्तचर विभागाच्या जबाबदाऱ्या वाढवण्यात आल्या होत्या. मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर ब्रिटीश भारत सोडून गेले, त्यानंतर या विभागाचे प्रशिक्षित मनुष्यबळ कमी झाले. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर संजीवी पिल्लई यांनी इंटेलिजन्स ब्युरोचे पहिले भारतीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. 1949 मध्ये पिल्लई यांनी परदेशात एक लहान गुप्तचर मोहीम काढली, परंतु 1962 च्या चीन-भारत युद्धात भारताचा पराभव झाला. 1962च्या भारत-चीन युद्धादरम्यान परकीय गुप्तचर यंत्रणेतील अपयशामुळे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देशाला समर्पित परदेशी गुप्तचर संस्था स्थापन करण्याचा आदेश दिला. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर लष्करप्रमुख जनरल जोयंतो नाथ चौधरी यांनीही परदेशातील इत्यंभूत माहिती संकलित करणारी भारताची स्वतःची यंत्रणा असावी, असे मत मांडले.  त्यानंतर 1966 च्या अखेरीस स्वतंत्र परदेशी गुप्तचर संस्थेची संकल्पना ठोस आकार घेऊ लागली.

(हेही वाचा तुम्हाला Location दाखवणारे GPS आहे तरी काय?)

‘रॉ’ थेट पंतप्रधानांना रिपोर्टींग करते

त्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांना इंटेलिजन्स ब्युरोचे तत्कालीन उपसंचालक आर.एन. काओ यांनी नवीन गुप्तचर यंत्रणेसाठी ब्लू प्रिंट सादर केली. काओ यांची भारतातील पहिली परदेशी गुप्तचर संस्था, रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून शत्रू राष्ट्र आणि मित्र राष्ट्रात अत्यंत खोलवर जात इत्यंभूत माहिती संकलित करण्याचे उद्दिष्ट या संस्थेचे ठरवण्यात आले. सुरुवातीपासूनच ‘रॉ’ थेट पंतप्रधानांना रिपोर्टींग करते, यावरून या यंत्रणेवर टीका होत होती. 250 कर्मचाऱ्यांसह ‘रॉ’ची सुरुवात झाली होती, त्यासाठी 20 दशलक्ष वार्षिक बजेट ठेवले होते. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीस 300 दशलक्ष होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here