बारामती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यात असलेलं पुणे जिल्ह्यातलं एक शहर आहे. या शहरात तहसील आणि नगर परिषदेची सेवा उपलब्ध आहे. हे शहर पुणे शहरापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आग्नेय दिशेला आणि मुंबईपासून सुमारे २५० किलोमीटर एवढ्या अंतरावर वसलेलं आहे. (Baramati)
◆बारामती शहराची वाहतूक
बारामती हे शहर राज्यातल्या इतर प्रमुख शहरांशी रस्त्याने जोडलेलं आहे. हे शहर पुण्यापासून रस्त्याने १०० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. या शहराचे रस्ते प्रमुख महामार्गांनाही जोडतात. बारामती हे दौंड जंक्शनच्या मार्गे पुण्याला रेल्वे मार्गाने जोडलेलं आहे. बारामतीला दोन बस स्थानकं असून मुख्य बस स्थानक हे इंदापूर रोडवर आहे. बारामती बस आगाराकडून शाळकरी मुलांना बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. (Baramati)
(हेही वाचा- Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस केवळ आमचे राजकीय शत्रू ; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण)
बारामतीमध्ये सध्या दोन फ्लाइंग स्कूल्स असलेलं विमानतळ आहे.
◆ बारामती शहरातली भेट देण्याची ठिकाणं
●श्री मयुरेश्वर मंदिर
श्री मयुरेश्वर मंदिर किंवा मोरेश्वर मंदिर हे मोरगाव गणपती म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर बारामती शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. मोरगाव इथलं मोरेश्वराचं मंदिर हे अष्टविनायकांपैकी एका गणपतीचं आहे. (Baramati)
(हेही वाचा- Diwali: फटाके उत्पादनाचे केंद्र असलेल्या शिवकाशीमध्ये यंदा उत्पादनात घट; काय आहे नेमकं कारण?)
●बाबूजी नाईक वाडा
१७४३ साली बाबूजी नाईकांनी बारामती शहरातून वाहणाऱ्या कर्हा नदीच्या काठावर एक भव्य किल्ला बांधला होता. हा किल्ला भीमथडी ते बारामतीच्या इतिहासाचा गौरवशाली साक्षीदार आहे. या वाड्यात एक वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या वस्तुसंग्रहालयात बाबूजी नाईक यांचं १७४३ ते १७८० या सालादरम्यानचं जीवनचरित्र पाहायला मिळणार आहे. तसंच सन १७८० ते २०१४ या सालादरम्यान घडलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक घटना आणि बारामती तालुक्यातले ऐतिहासिक शिलालेखही पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत. याव्यतिरिक्त किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी करण्यात येणार असून पर्यटकांना या किल्ल्याच्या तटबंदीवरून चालता येणार आहे. त्याचबरोबर बुरुजाचा ढासळलेला भाग, टाऊन हॉल, मुख्य प्रवेशद्वार यांचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे. (Baramati)
● भिगवण पक्षी अभयारण्य
भिगवण हे बारामतीपासून २५ किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेलं एक छोटं शहर आहे. बारामतीहून राज्य परिवहन मंडळाच्या बसने भिगवण येथे पोहोचता येतं. भिगवण पक्षी अभयारण्य हे भिगवण शहरापासून १० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीने पोहोचणं कठीण आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे स्थलांतरित लोक डिकसळ आणि कुंभारगाव या ठिकाणी येऊन राहतात. या गावांच्या भागात उजनी नावाचं एक धरण आहे. गावांच्या जवळच्याच भागात बॅकवॉटर पसरलं आहे. डिकसळच्या बॅकवॉटर परिसरात हे पक्षी आढळतात. भिगवणपासून डिकसळ हे गाव ७ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. पक्षी पाहण्यासाठी येथे लहान मासेमारी बोटी भाड्याने घेतल्या जाऊ शकतात. भिगवण इथल्या पक्षी अभयारण्यात पर्यटक गुलाबी फ्लेमिंगो आणि इतर बरेच पक्षी पाहण्यासाठी येतात. येथे भारतातल्या वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त येथे येताना वाटेत एक ऐतिहासिक भुलेश्वर मंदिर आहे. या मंदिराला नक्की भेट द्या. (Baramati)
(हेही वाचा- Diwali: फटाके उत्पादनाचे केंद्र असलेल्या शिवकाशीमध्ये यंदा उत्पादनात घट; काय आहे नेमकं कारण?)
● श्री शिरसाई मंदिर, शिरसुफळ
श्री शिरसाई मंदिर हे शिरसाई देवीचं मंदिर आहे. हे मंदिर बारामती शहरापासून सुमारे २७.४ किलोमीटर एवढ्या अंतरावर पुणे जिल्ह्यातल्या शिरसुफळ, बारामती येथे स्थापित आहे. या मंदिरात आणि शिरसुफळ गावात अनेक माकडे आहेत. या गावाला “माकडांचं गाव” असंही म्हटलं जातं. (Baramati)
● श्री जनाई मंदिर, काटफळ
श्री जनाई मंदिर हे देवी जनाईचं मंदिर आहे. हे मंदिर बारामती शहरापासून सुमारे ७ किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेल्या कटफळ नावाच्या गावात आहे. (Baramati)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community