११ जानेवारीला अमेरिकेत का पाळला जातो National Human Trafficking Awareness Day?

अमेरिकेसह इतर काही देश देखील हा दिवस पाळतात. भारतातही ही समस्या आ-वासून उभी आहे. त्यासाठी लवकरात लवकर कठोर कायदे आणि सुरक्षा प्रदान करणे अत्यंत गरजेचे आहे.

256
११ जानेवारीला अमेरिकेत का पाळला जातो National Human Trafficking Awareness Day?

मानवी तस्करी ही जगातली खूप मोठी समस्या आहे. यामध्ये माणसाला विकले आणि खरेदी केले जाते. पूर्वी गुलाम पद्धत अस्तित्वात होती. हा साधारण तसलाच प्रकार आहे. मानव तस्करी करुन मजूरी केली जाते, अवयवाची विक्री केली जाते आणि लैंगिक व इतक गोष्टी साध्य केल्या जातात. (National Human Trafficking Awareness Day)

(हेही वाचा – Mahadev Betting App : प्रवर्तक रवी उप्पलच्या प्रत्यार्पणाला न्यायालयाची मंजुरी; ईडीच्या कारवाईला यश)

का पाळला जातो राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिन ?

विशेष म्हणजे स्त्रिया आणि लहान मुलांच्या बाबतीत मानव तस्करीचे गुन्हे घडतात. या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी अमेरिकेमध्ये National Human Trafficking Awareness Day पाळला जातो. २००७ मध्ये अमेरिकेच्या सिनेटने ११ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिन (National Human Trafficking Awareness Day) म्हणून पाळण्याची घोषणा केली.

(हेही वाचा – Rahul Dravid : द वॉल : भारतीय संघाची मजबूत भिंत)

मानव तस्करीमुळे दरवर्षी लाखो लोक विस्थापित होतात

तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी जानेवारी २०१० चा संपूर्ण महिना मानवी तस्करीविषयी जागरूकता (National Human Trafficking Awareness Day) निर्माण करण्यासाठी पाळला होता. या मानव तस्करीमुळे दरवर्षी लाखो लोक विस्थापित होतात आणि त्यांच्या घरापासून दूरच्या देशात जातात. मानवी तस्करीचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे लैंगिक शोषण, म्हणून हा अन्याय स्त्रियांच्या बाबतीत अधिक घडतो. इतकंच काय तर मानवी मांस भक्षण करण्यासाठी देखील ही तस्करी केली जाते.

(हेही वाचा – Ram Mandir: राम लल्ला मंदिर परिसरात यजुर्वेद पठणाला सुरुवात, १२१ वेदपतींना आमंत्रण)

माणूस म्हणून जगण्याचा अधिकार –

त्यामुळे ११ जानेवारीला याबाबत जागरुकता (National Human Trafficking Awareness Day) निर्माण केली जाते. देशातील कायदे कठोर करावेत यासाठी याचना केली जाते. आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, ही जाणीव निर्माण केली जाते. अमेरिकेसह इतर काही देश देखील हा दिवस पाळतात. भारतातही ही समस्या आ-वासून उभी आहे. त्यासाठी लवकरात लवकर कठोर कायदे आणि सुरक्षा प्रदान करणे अत्यंत गरजेचे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.