राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या सल्लागाराने त्यांना ‘कर-नाटक’ म्हटले असावे, म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांवर टिका केली आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की संघाने ब्रिटिशांना मदत केली होती आणि सावरकरांना इंग्रजांकडून पैसे मिळत होते. पुढे राहुल म्हणाले, ‘यह कांग्रेस पार्टी के नेता थे जिन्होंने अंग्रेजों से लड़ाई की, जिन्होंने जेल में कई साल बिताया। महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, उन्होंने अंग्रेजों से लड़ते हुए अपनी जान दे दी।’
( हेही वाचा : उबेरमधून प्रवास करताना अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव! आरडाओरड केल्यानंतर झाली सुटका )
मुळात राहुल गांधी काय बोलतात, ह्याचे त्यांना भान राहत नाही. स्मिता प्रकाश यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांची घेतलेली पोडकास्ट मुलाखत ऐकण्यासारखी आहे. मुख्यमंत्री महोदय २२ वर्षे कॉंग्रेसमध्ये होते. त्यांनी मागे एकदा सांगितले होते की राहुल गांधींकडे पिदी नावाचा कुत्रा आहे आणि कुणी त्यांना भेटायला आले, गंभीर विषयावर चर्चा सुरु असली तरी ते बोलणाऱ्याकडे लक्ष न देता पिदीकडे लक्ष देतात आणि काँग्रेसचे कार्यकर्ते राहुलचे मन राखण्यासाठी पिदीबरोबर चांगले वागतात.
हेमंत बिस्व सर्मा म्हणतात की, राहुल गांधींची मूळ समस्या अशी आहे की, त्यांचा जन्म राजकारणासाठी झालेला नाही. दुसरी गोष्ट ते राजकारणाच्या बाबतीत जरा सुद्धा गंभीर नाहीत. कुणाशी चर्चा करत असतील तर ते मध्येच उठून जॉगिंग करायला लागतात किंवा दुसऱ्या खोलीत जाऊन बसतात आणि अर्ध्या तासाने पुन्हा येतात. त्यात आपण गांधी आहोत, याबद्दल त्यांना गर्व आहे. सर्वसाधारण भाषेत यास ‘माज करणे’ असे म्हणतात आणि कॉंग्रेसने एक अशी समज करुन घेतली आहे की, ह्या ड्युप्लिकेट गांधी कुटुंबाशिवाय कॉंग्रेस अपूर्ण आहे. त्यामुळे सत्ताकेंद्र गांधी कुटुंबाच्या अवतीभोवती फिरत असते. आताही राहुल गांधींनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले नसले तरी भारत जोडो यात्रेचे ते प्रमुख आहेत. जर तुम्ही अध्यक्ष नाहीत तर तुम्ही एक साधे खासदार आहात. पण कॉंग्रेसच्या लोकांना गांधी कुटुंबातील व्यक्तीच अध्यक्ष म्हणून हवी आहे.
आता भारत जोडो यात्रेदरम्यान दोन वेळा कॉंग्रेसने सावरकरांचा फोटो लावला होता. सर्वसामान्य भारतीयांना आणि तसे पाहता सर्वच पक्षातील लोकांना सावरकरांच्या त्यागाबद्दल आदर आहे. कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सावरकरांचा फोटो लागतो याचा अर्थ कॉंग्रेसलाही सावरकर हवे आहेत. केवळ गांधी कुटुंबाला सावरकर नकोत. राहुल असे म्हणतात की महात्मा गांधी, नेहरु, पटेल यांनी देशासाठी बलिदान दिले. राहुल गांधी यांचा इतिहास कच्चा आहे. नेहरुंचा मृत्यू एका दुर्मीळ आजाराने झाला होता. नेहरू हे फाईव्ह स्टार क्रांतिकारक होते. सावरकर, भगतसिंग इत्यादी क्रांतिकारकांना ज्या यातना भोगाव्या लागल्या, तशा नेहरुंना भोगाव्या लागल्या नाहीत. ब्रिटिंशांनी त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली होती.
देश सोडून जाताना देखील त्यांनी नेहरुंच्या हाती देश सोपवला, हे विशेष. नेहरू हे पराभूत राजकारणी होते. नेहरुंमुळे काश्मीरपासून अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्या समस्या आता नरेंद्र मोदी यांनी सोडवल्या आहेत. हे सत्य लोकांना कळले तर राहुल गांधींचे दुकान बंद होईल म्हणून राहुल गांधी सावरकरांना घाबरतात. सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आतंकवादाला सडेतोड उत्तर, भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट, देशात हिंदू-भावविश्वाचे वातावरण ह्या गोष्टी राहुल गांधींना नकोत. कारण राहुल गांधी ज्या विचारांचे आहेत, ते विचार या गोष्टीस अनुमती देत नाहीत. तसेच या सकारात्मक गोष्टीच्या विरोधात काम करण्यास हा विचार प्रवृत्त करतो.
कारण राहुल गांधी म्हणजे भ्रष्टाचार, राहुल गांधी म्हणजे अराजकता, राहुल गांधी म्हणजे पाकिस्तानी प्रवृत्तीसमोर शेपूट घालणे, राहुल गांधी म्हणजे नेभळटपणा, राहुल गांधी म्हणजे बेरोजगारी, राहुल गांधी म्हणजे हिंदू-मुस्लिम तणाव व जातीयवाद. या सर्व नकारात्मक गोष्टींच्या विरोधात सावरकरी तत्व आहे. सावरकरी तत्व किंवा सावरकरांचे विचार जर जनमानसात रुजले तर राहुल गांधीचे हे दुकान बंद होईल आणि त्यांचा कॉंग्रेसवरचा प्रभाव कमी होईल व बऱ्याच गोष्टी त्यांच्या हातून निसटून जातील.
म्हणून सोनिया गांधी यांच्या संस्कारानुसार राहुल गांधी सावरकरांना घाबरतात. पण कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना सावरकर हवे आहेत हे सिद्ध झाले आहे. हेमंत बिस्व सर्मा म्हणतात की, आता कॉंग्रेसला हळूहळू कळू लागले आहे की गांधींशिवाय देखील कॉंग्रेसचे अस्तित्व असू शकते. अर्थात कॉंग्रेसने आपली गाय गांधी कुटुंबाच्या गोठ्यात बांधली आहे. त्यामुळे हा बदल घडायला अजून थोडा वेळ लागणार आहे. तरी राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री प्रामाणिक नाहीत हे भारतीयांना २०१४ साली कळले म्हणून त्यांनी दोघांना नाकारले आणि मोदींच्या रुपात देशात सावरकरी विचार रुजू झाले. आज देश सावरकरांच्या विचाराने चालला आहे, हे राहुल गांधींच्या भितीचे खरे कारण आहे.
Join Our WhatsApp Community