मुंबई महापालिकेची निवडणूक अजून का घेतली नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 24 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांसह पंचायत समितीच्या निवडणुका अजून का घेतल्या नाहीत? अशी विचारणा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. दर पाच वर्षांनी निवडणुका घ्याव्यात. या घटनेने घातलेल्या नियमांचे राज्य निवडणूक आयोगाने उल्लंघन केले आहे. तसेच, आयोगाची ही कृती देशद्रोही असल्याने याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुंबईतील रहिवासी रोहन पवार याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाचे अधिकार कोणीच हिरावून घेऊ शकत नाहीत. निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा अधिकार अबाधित आहे. तरीही निवडणूक आयोगाकडून निवडणुका का घेतल्या जात नाहीत? असा प्रश्न याचिकाकर्त्याच्यावतीने त्यांचे वकील अॅड प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद करताना उपस्थित केला.

( हेही वाचा: गुजरातमधील सारिगाम GIDC तील कंपनीत बॉयलरचा स्फोट; स्फोटामुळे इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here