दरवर्षी १० फेब्रुवारीला जागतिक कडधान्य दिन म्हणजेच (World Pulses Day) साजरा केला जातो. जागतिक स्तरावर डाळींचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे पोषण तत्व लक्षात घेऊन या दिवसाची सुरुवात करण्यात आली. डाळीचे सेवन केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही केले जाते. शाकाहारी लोकांसाठी डाळी हा प्रथिनांचा सर्वात मोठा स्रोत आहे.
डाळींचा उपयोग केवळ पोषण मिळवण्यासाठीच होत नाही तर उपासमार आणि गरिबी दूर करण्यातही मदत होत आहे. हा दिवस पहिल्यांदा २०१८ साली साजरा केला गेला. या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये जगात ५ वा जागतिक कडधान्य दिन साजरा होत आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये डाळींद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पोषक तत्वांबद्दल जागरूकता पसरवणे हा आहे.
(हेही वाचा : Uttarakhand UCC : समान नागरी कायद्याच्या विरोधात उत्तराखंडात ‘शाहीन बाग’ची पुनरावृत्ती होणार?)
संयुक्त राष्ट्रांनी ही रणनीती आखली
संयुक्त राष्ट्रांना डाळींचे उत्पादन वाढवून (World Pulses Day) जगातील गरीब कुपोषित देशांना पौष्टिकतेने समृद्ध अन्न उपलब्ध करून द्यायचे आहे. कारण डाळींमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्वे असतात. २०३० पर्यंत शाश्वत विकास साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ही रणनीती आखली आहे. भारतात सुमारे ११ प्रकारच्या डाळी आढळतात, ज्यामध्ये मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, राजमा, उडीद डाळ, चणे डाळ, हिरवे वाटाणे, पांढरे वाटाणे, मटकी, चवळी आणि काळा हरभरा यांचा समावेश आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे भारताने जर ठरवलं तर भारत जगाचा अन्नदाता होऊ शकतो.
प्रत्येक दिवस पाळताना एक थीम निश्चित केली जाते. तशी थीम कडधान्य दिवसासाठी सुद्धा केली आहे. यावर्षी २०२४ मध्ये, जागतिक कडधान्य दिनाची थीम “कडधान्ये: माती आणि लोकांसाठी पौषक तत्व” (Pulses: nourishing soil and people) अशी ठेवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community